बेंगळुरू येथील महालक्ष्मी या २९ वर्षीय महिलेची हत्या करणाऱ्या मुक्तिरंजन प्रताप रे याने ओडिशात आत्महत्या केली. महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. घटना घडल्यापासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी मृतावस्थेत आढळला. पोलिसांना आरोपीची डायरीही सापडली असून त्यातून संपूर्ण सत्य समोर आले आहे.
ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय मुक्तिरंजन प्रताप रे याचे महालक्ष्मीसोबत प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. याच कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत, त्यामुळे मुक्तिरंजनने महालक्ष्मीची हत्या केली. बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी एक व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून सापडलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये मुक्तिरंजन प्रताप रे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे दिसून आले आहे.
बेंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आणि महालक्ष्मी यांची भेट कपड्यांच्या दुकानात काम करत असताना झाली आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले. प्राथमिक तपासानुसार, रे तापट स्वभावाचा होता. वादानंतर त्याने महालक्ष्मीची हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले.
भद्रकचे एसपी वरुण गुंटुपल्ली यांनी सांगितले की, पोलिसांना रे यांची डायरी मिळाली आहे ज्यामध्ये त्याने बेंगळुरूच्या महिलेची हत्या केल्यानंतर तिचे ५९ तुकडे केल्याची कबुली दिली आहे.
हत्येनंतर रे यांनी आपल्या धाकट्या भावाला फोन करून तातडीने भाड्याचे घर रिकामे करण्याच्या सूचना दिल्या. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कारण विचारले असता रे यांनी आपल्या भावाला सांगितले की ते प्रत्यक्ष भेटल्यानंतर सांगतो, हे फोनवर सांगू शकत नाहीत. धाकट्या भावाकडे चौकशी केली असता खून केल्यानंतर रे घरी परतला आणि यापुढे शहरात राहू शकत नाही आणि मूळ गावी जात असल्याचे सांगितले.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी टेक्निकल अॅनालिसिस आणि कॉल रेकॉर्ड डिटेल्सची मदत घेतली. सुरुवातीला तिचे मोबाइल लोकेशन पश्चिम बंगालचे होते, पण नंतर ते बंद करण्यात आले. मात्र टेक्निकल सर्व्हेलन्सच्या मदतीने ओडिशातील एका गावात त्याचे लोकेशन शोधण्यात आले आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठवली. ओडिशातही त्याने आपली जागा बदलली. त्यानंतर आरोपी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
आरोपी रे याच्या आईने कुंजलता रे यांनी सांगितले की, महालक्ष्मीने आपल्या मुलाला जाळ्यात ओढले होते. ती त्याच्याकडे सारखे पैसे मागायची, असे मुलाने आपल्याला सांगितले होते. ती महिला त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती. यामुळे त्याने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि महिला एका कपड्याच्या दुकानात काम करत होते. तिथेच त्यांच्याच मैत्री झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील सुरु झाले होते.