Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

May 19, 2024 11:13 AM IST

Bengaluru - Kochi Air India Flight Catches Fire: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

बंगळुरू - कोची एअर इंडियाच्या विमानाला आग, इमर्जन्सी लँडिंग
बंगळुरू - कोची एअर इंडियाच्या विमानाला आग, इमर्जन्सी लँडिंग

Air India flight News: बेंगळुरू विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात एकूण १७९ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते आणि सर्वजण सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, विमानाला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर खळबळ माजली.

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोचीला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या व्यवस्थापनाने एक निवेदन जारी करून सांगितले की, विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १८ मे २०२४ रोजी बेंगळुरूहून कोचीला जाणाऱ्या आयएक्स ११३२ या विमानाच्या एका इंजिनला आग लागल्यानंतर रात्री ११ वाजून १२ मिनिटांनी बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर उजव्या इंजिनातून आगीचे लोट निघत असल्याचे लक्षात येताच बेंगळुरू-कोची विमानाने माघार घेतली आणि बेंगळुरू येथे लँडिंग केले. ग्राऊंड सर्व्हिसेसनेही आगीची माहिती दिली, यानंतर लोकांना बाहेर काढण्यात आले.

प्रवाशांसाठी पर्यायी उड्डाणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ही एअरलाइन्सकडून सांगण्यात आले. कोणत्याही प्रवाशाला कोणतीही इजा न होता बाहेर काढण्यात आले. यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि आमच्या प्रवाशांना लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.

दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ८०७ या विमानाच्या एसी युनिटला आग लागल्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानात १७५ प्रवासी होते आणि सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी विमान आयजीआयमध्ये सुखरूप उतरले.

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.आम्हाला संध्याकाळी ६.१५ वाजता आयजी विमानतळाकडून माहिती मिळाली. आम्ही तातडीने तीन अग्निशमन बंब पाठवले. मात्र, विमान सुखरूप उतरले आणि कोणताही अपघात झाला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर