कर्नाटकात कन्नड़ भाषेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष करून बेंगळुरु आपल्या बहुसांस्कृतिक लोकसंख्येसाठी ओळखले जाते. येथील स्थानिक लोक परप्रातीयांना कन्नड भाषा शिकण्याचा सल्ला देतात. ते असा दावा करतात की, हे येथील स्थानिक संस्कृतीचा सन्मान करण्याची पद्धत आहे. आता “बेंगळुरु उत्तर भारत आणि शेजारच्या राज्यांसाठी बंद आहे, जे कन्नड़ भाषा शिकणार नाहीत" अशा पोस्टने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पोस्टमध्ये एक्स यूजरने सल्ला दिला आहे की, जे लोक स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणार नाहीत, त्यांनी बेंगळुरूमध्ये य्ऊ नये. युजरने लिहिले आहे की, बेंगळुरु उत्तर भारत आणि शेजारच्या राज्यांसाठी बंद आहे, जे कन्नड शिकणार नाहीत. जर ते येथील भाषा व संस्कृती सन्मान करणार नसतील तर त्यांची बेंगळुरूमध्ये काहीच गरज नाही.
शेअर केलेल्या या पोस्टने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही पोस्ट ५०,००० हून अधिव वेळा पाहिली गेली आहे आणि २०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. या पोस्टने भाषावादाला पुन्हा हवा मिळाली आहे. काही यूजर्स पोस्ट करणाऱ्याच्या भावनेच्या समर्थनार्थ आहेत तर अन्य यूजर त्याच्यावर टीका करताना म्हटले की, दूसरी भाषा शिकणे प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा आहे. कोणी त्याच्यावर सक्ती करू शकत नाही.
एका यूजरने म्हटले की, मी तुझ्या मताशी सहमत आहे, मात्र सरकारने बंगळुरूत प्रवास करण्याचची अनुमती देण्याआधी हे गोष्ट सक्तीची केली पाहिजे. गर्दीने न्याय करणे कधीही योग्य समाधान नाही. दुसऱ्याने म्हटले की, माझे मत आहे की, कर्नाटकमध्ये केवळ कन्नड भाषेचा वापर केला जावा. येथे इंग्रजीसह अन्य सर्व भाषांवर बंदी लादली पाहिजे. जर कोणी इंग्रजी भाषेच्या वापराबाबत तर्क देत असेल तर हाच तर्क अन्य भाषांवरही लागू होऊ शकतो. त्यामुळे यावर चर्चा करून मार्ग शोधावा शुत्रत्वातून याचे समाधान होऊ शकणार नाही.
दरम्यान,एका यूजरने लिहिले की, तुम्ही नेहमीप्रमाणे संभ्रमात आहात. दूसरी भाषा शिकणे वैयक्तिक इच्छ आहे, आणि दूसरी संस्कृती, भाषेचा सन्मा करणे दुसरी गोष्ट आहे. तुम्ही दुसऱ्यांची संस्कृती आणि भाषेचा सन्मान करू शकता, भलेही तुम्ही ती भाषा बोलू शकत नसाल.
अन्य एका युजरने लिहिले की, भारत तुमच्यासाठी बंद आहे, जो भारतातील कमीत कमी टॉपच्या ५ भाषा शिकत नाहीत, तुम्ही जर भारतीयांची भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करू शकत नसाल तर भारताला तुमची आवश्यकता नाही.
संबंधित बातम्या