cyber fraud Case : बेंगळुरूमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थिनीने सायबर फसवणुकीत पैसे गमावल्याने नैराश्येतून आपले जीवन संपवले. वसतिगृहाच्या खोलीत रविवारी रात्री तिने आत्महत्या केली.
पवना असे आत्महत्या केलेल्या तरुणीने नाव आहे. (girl student suicide) ती कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोलार गोल्ड फिल्ड्स (केजीएफ) येथील रहिवासी होती. पवना महाराणी क्लस्टर विद्यापीठात बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. रात्री उशीरा एक मित्र खोलीत आला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
प्राथमिक तपासात समोर आले की, पवना हिने तिच्या मैत्रिणींकडून १५,००० रुपये उसने घेतले होते आणि १० हजार रुपये परत करण्यात यश मिळवले होते.
पवना ही बस कंडक्टरची मुलगी असून तिने सुसाईड नोट सोडली आहे. तिच्या मोबाईलचे लॉक उघडता येत नसले तरी सायबर फसवणुकीत तिने काही पैसे गमावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिने ज्या सायबर गुन्ह्यात पैसे गमावले, त्याचे स्वरूप अद्याप समजू शकलेले नाही. ऑनलाइन व्यवहार तपासण्यासाठी तिचा फोन अनलॉक करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पवनाने तिच्या मित्रांकडून १५ हजार रुपये उधार घेतले होते आणि १० हजार रुपये परत केले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सुसाईड नोटमध्ये तिने ज्या मित्रांचे पैसे थकवले आहेत, त्यांची नावे बारकाईने नमूद केली असून आई-वडिलांचे कर्ज फेडण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती सुरू आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारने शुक्रवारी रात्री सायन येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृत हवालदाराच्या खिशात सुसाईट नोट सापडली, ज्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले. पत्नीशी दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून हवालदाराने आपली जीवनयात्रा संपवली, असे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या