Viral Video: गाडी चालवताना कॅबचालकाला आली झोप, पुढं असं घडलं की...; व्हिडिओ होतोय व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: गाडी चालवताना कॅबचालकाला आली झोप, पुढं असं घडलं की...; व्हिडिओ होतोय व्हायरल!

Viral Video: गाडी चालवताना कॅबचालकाला आली झोप, पुढं असं घडलं की...; व्हिडिओ होतोय व्हायरल!

Dec 30, 2024 12:50 PM IST

Bengaluru Cab Driver Viral Video: बंगळुरूमधील कॅबचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

व्हायरल व्हिडिओ: गाडी चालवताना कॅबचालकाला आली झोप, पुढं असं घडलं की...
व्हायरल व्हिडिओ: गाडी चालवताना कॅबचालकाला आली झोप, पुढं असं घडलं की...

Viral News: आयआयएम पदवीधर आणि कॅम्प डायरीज बेंगळुरूचे संस्थापक यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिलिंद चांदवानी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने बेंगळुरू विमानतळावरून रात्री उशीरा कॅब प्रवासादरम्यानचा एक विचित्र अनुभव शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कॅब ड्रायव्हर पॅसेंजर सीटवर झोपलेला दिसत असून तो कार चालवताना दिसत आहे.

चांदवानी यांनी आपल्या पोस्टमध्ये या घटनेचे वर्णन करताना म्हटले आहे की, काल रात्री ३ वाजता बेंगळुरू विमानतळावरून परतत असताना मी स्वतःला एका अनपेक्षित भूमिकेत पाहिले. माझ्या कॅबचालकाला चहा पिऊन आणि सिगारेट ओढूनही त्याला झोप आवरता आली नाही. त्यानंतर मी त्याला गाडी चालवण्याची ऑफर दिली. त्याने लगेच गाडीची चावी माझ्या हातात दिली. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर तो बाजूला सीटवर बसला आणि झोपला. मी गाडीतून उतरण्याअगोदर पाच मिनिटे आधी त्याच्या मालकाचा फोन आला. त्यावेळी त्याने मालकाकडे दिवसाची शिफ्ट मागितली. कारण, त्याला झोपेवर नियंत्रण ठेवता येत नाही.

मिलिंदने पुढे लिहिले की, कॅब चालकाने माझ्यावर विश्वास ठेवला, याचा मला आनंद आहे. पण गाडी चालवताना मला खूप कसरत करावी लागली, याचे दुःख आहे. मी गाडी चालवू शकतो, हे त्याने झटक्यात ओळखले. त्याला मी १०० रुपये टीप दिली. त्याबदल्यात ५ स्टार रेटिंग देखील मागितली. मिलिंदने हा अनुभव शेअर करण्यामागचा हेतू देखील स्पष्ट केला आहे. जीवन अनपेक्षित चढ-उतारांनी भरलेले आहे. दयाळू व्हा, सहानुभूती बाळगा आणि तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य सुधारा. कारण तुम्हाला त्याची कधी गरज भासेल हे सांगता येत नाही.

मिलिंगची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि सुमारे चार लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, 'हे हास्यास्पद आहे. परंतु, कॅबचालकाने अधिक काळजी घेतली पाहिजे.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'कॅबचालकाने दाखवलेला विश्वास हृदयस्पर्शी आणि चिंताजनक आहे.' काहींनी चांदवानी यांच्या दयाळूपणाचे कौतुक केले आणि एका कमेंटमध्ये म्हटले की,'तुम्ही एका गैरसोयीचे रूपांतर सहानुभूतीच्या क्षणात केले.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर