Bengaluru: गोव्यात बेंगळुरूच्या सीईओनं केली ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या; असे झाले हत्याकांड उघड-bengaluru ceo murders her 4 year old son in goa held at karnataka ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bengaluru: गोव्यात बेंगळुरूच्या सीईओनं केली ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या; असे झाले हत्याकांड उघड

Bengaluru: गोव्यात बेंगळुरूच्या सीईओनं केली ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या; असे झाले हत्याकांड उघड

Jan 09, 2024 01:14 PM IST

goa murder news : कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका ३९ वर्षीय स्टार्टअप कंपनीची संस्थापक आणि सीईओने आपल्याच ४ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी उत्तर गोव्यातील कँडोलीम येथील एका हॉटेलमध्ये घडली.

Goa murder news
Goa murder news

Goa murder news : : कर्नाटकातील बेंगळुरू येथील माइंडफुल एआय लॅब या स्टार्टअप कंपनीची संस्थापक आणि सीईओ असलेल्या सूचना सेठ (वय ३९) यांनी  आपल्याच ४ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी उत्तर गोव्यातील कँडोलीम येथील एका हॉटेलमध्ये घडली. या महिलेने आपल्या मुलाची हत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.  मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून टॅक्सीकरून पुन्हा कर्नाटकात जात असतांना या घटनेचा उलगडा झाला. 

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे धमाका! 'या' उत्पादनांवर मिळणार मोठी सूट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ असे आरोपी महिलेचे नाव आहे. सूचना सेठ हिने सोमवारी आपल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेत भरून पुन्हा कर्नाटकला परत जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली. सुचना सेठ सोमवारी सकाळी अपार्टमेंटमधून बाहेर पडली. यावेळी सदनिकेची साफसफाई करताना सफाई कर्मचार्‍यांला फ्लॅटमध्ये फरशीवर रक्ताचे डाग आढळले. याची माहिती त्याने पोलिसांना दिली. गोवा पोलिसांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आयमंगला पोलिस ठाण्यात संपर्क साधत सूचना सेठ यांना अटक करण्याचे सांगितले. दरम्यान, सुचनाला ताब्यात घेण्यासाठी आणि ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यासाठी कळंगुट येथून पोलिसांचे पथक सोमवारी उशिरा कर्नाटकला रवाना झाले होते.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

कळंगुट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सूचना सेठ आपल्या मुलासह शनिवारी गोव्यातील कॅंडोलिमच्या हॉटेल सोल बन्यान ग्रांडे येथे रुम क्रमांक ४०४मध्ये थांबल्या होत्या. यावेळी सुचनाने बेंगळुरूचा पत्ता दिला. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी पोलिसांना सांगितले की परत जातांना सूचना यांना विमानाने जाणे सोपे आणि स्वत राहील असे सांगून देखील त्यांनी टॅक्सी करण्याचा आग्रह धरला. सूचना सेठ यांच्या हट्टामुळे हॉटेलने टॅक्सी ची व्यवस्था करून दिली.

दरम्यान, सूचना हॉटेल रूममधून आपल्या मुलाशीवाय बाहेर पडल्या. रूम साफ करण्यासाठी कर्मचारी आला असतात, सूचनाच्या खोलीत त्याला रक्ताचे डाग दिसले. यामुळे संशय बाळवल्याने हॉटेल स्टाफने याची माहिती माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यात सुचना आपल्या मुलाशिवाय रूममधून बाहेर पडताना दिसली. इन्स्पेक्टर नाईक यांनी सूचना हीच्या टॅक्सी चालकाला फोन करून सुचना सेठ यांना फोन देण्यास सांगितले.

यावेळी पोलिसांनी सुचना यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारपूस केली, सुचना यांनी मुलाला त्यांच्या नातेवाईकांकडे सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला त्यांचा पत्ता मागितला. सूचना हिने पोलिसांना दिलेला पत्ता हा खोटा असल्याचे आढळले. यामुळे त्यांचा संशय बळावला. यानंतर पोलिस निरीक्षक नाईक यांनी पुन्हा टॅक्सी चालकाला फोन केला, आरोपी सूचना यांना संशय येऊ नये यासाठी नाईक यांनी चलकाची कोंकणी भाषेत संवाद साधून जवळच्या पोलिस ठाण्यात टॅक्सी घेऊन जाण्यास सांगितले. तोपर्यंत टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली होती.

ड्रायव्हरने सुचनाला याचा सुगावा न लागू देता गाडी ही आयमंगला पोलिस ठाण्यात नेली. तेथील एका अधिकाऱ्याने गाडीची तपासणी केली असता एका पिशवीत मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर सूचना सेठ यांना अटक करण्यात आली आहे.

विभाग