brahmin genes row : बंगळुरूच्या एका कंटेंट मार्केटिंग कंपनीच्या सीईओ अनुराधा तिवारी यांनी ट्विटरवर 'ब्राह्मण जीन' कॅप्शन देत स्वत:चा फोटो पोस्ट केला. यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. या वादात लेखक चेतन भगत यांनीही उडी घेतली. ब्राह्मण जीन या वादावर बोलताना चेतन भगत लिहिले की, 'जातीचा मुद्दा जितका जास्त उपस्थित केला जाईल, तितके हिंदूमध्ये फूट पडणार आहे. आणि हो, #BrahminGenes ट्रेंड हिंदू मतांमध्येही फूट पाडणारा आहे. लोकांना ते कळते की नाही माहीत नाही.'
दुसरीकडे अनुराधा तिवारी या मागे हटण्यास तयार नाहीत. याआधी त्यांनी #BrahminGenes ट्विट केले होते. मात्र, आता त्यांनी फॉलोअपही पोस्ट केला आहे. अनुराधा तिवारी लिहितात की, ‘ब्राह्मण आज आपले पूर्ण नाव सांगायलाही घाबरतात. त्याच्याविरोधात प्रचंड द्वेष पसरवण्यात आला आहे. आम्हाला सामाजिक न्याय कार्यकर्ते आणि नेत्यांनी खलनायक बनवले आहे. आम्ही कोणाचेही नुकसान केलेले नाही. सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही. आम्ही कठोर परिश्रम करतो. मग आपल्याला आपल्या जातीची लाज कशाला वाटावी.’
अनुराधा तिवारी यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावरील दोन गट पडले आहेत. काही लोकांनी अनुराधा यांच्या पोस्टला असंवेदनशील म्हटले आहे. तर, अनेकांनी आरक्षणाची चर्चा सुरू केली. दरम्यान, अनुराधा तिवारी यांनी चेतन भगत यांच्या ट्विटला उत्तर देत असे म्हटले आहे की,'ब्राह्मणांविरोधातील द्वेष हिंदूंना एकत्र आणतो का? आरक्षणामुळे हिंदूंमधील ऐक्य वाढते का? की जातीय जनगणनेमुळे हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण होईल?' पण जेव्हा ब्राह्मणांनी स्वतःची बाजू मांडायची ठरवली, तेव्हा अचानक हिंदू एकता धोक्यात आली.'
अनुराधा तिवारी यांनी आपल्या आणखी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या २४ तासात हजारो लोकांनी अभिमानाने आपली ब्राह्मण ओळख जाहीर केली आहे. पण किती नेत्यांनी तसे केले. ब्राह्मणांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ येते, तेव्हा ते माघार घेतात.ब्राह्मणांबद्दल जाणीवपूर्वक द्वेष पसरवला जात आहे का? क्षुल्लक राजकारणासाठी ब्राह्मणांना बळीचा बकरा बनवले जात आहे का?