Viral news : सध्या भारतात डिजीटल क्रांति झाली आहे. कोरोना काळानंतर ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजीटल व्ययव्हरांना पसंती दर्शविली जाते. दुकानात, मॉलमध्ये तसेच रस्त्यावरील फेरीवाले सुद्धा डिजीटल पेमेंटला प्राधान्य देत असतात. यासाठी क्युआर कोडचा प्रामुख्याने वापर केला जातो. क्युआर कोडच्या मशीन दुकानात लावलेल्या तुम्ही पहिल्या असेलच. मात्र, बेंगळुरू येथील एका रिक्षा चालकाने क्युआर कोडचा फोटो रिक्षात न लावता थेट त्याच्या स्मार्ट वॉचमध्ये त्याने क्युआर कोड लावला आहे. रिक्षात बसलेल्या नागरिकांना स्मार्ट वॉचमधील क्युआर कोड दाखवून हा रिक्षा चालक पेमेंट स्वीकारत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
विश्वजीत नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या एक्सहँडलवर या रिक्षाचालकाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत रिक्षा चालक त्याच्या स्मार्ट वॉचमधील क्युआर कोड दाखवून पैसे घेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ २० सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला ६ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिला असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ऑटो ड्रायव्हर खूपच हुशार दिसतो, ही डिजिटल इंडियाची जादू आहे. तर दुसऱ्याने डिजीटल ऑटो अण्णा असे रिक्षा चालकाला संबोधले आहे. तर एकाने हे नवीन भारताचे नवे चित्र आहे, असे म्हटलं आहे. तर चौथ्याने लिहिले की तुम्ही सहजपणे समजू शकता की बेंगळुरू हे भारतातील तंत्रज्ञान शहर का आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने एक्सवर यनम्मा टोनी स्टार्कला आज भेटलो. माझ्या ऑटो ड्रायव्हरला क्युआर कोड विचारला. त्याने थेट हात पलटवला व त्याचे स्मार्टवॉच दाखवले. त्याने त्यात क्युआर कोड सेव्ह केल्याचे दिसून आले. त्याचा स्मार्टवॉचचा स्क्रीनसेव्हर खूप मोठा आहे.