मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mamata Banerjee injured : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee injured : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 14, 2024 08:56 PM IST

Mamata Banerjee Injured : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी जखमी झाल्या आहेत. टीएमसीने आपल्या X हँडलवरून याची माहिती दिली आहे. टीएमसीने लिहिले आहे की, आमच्या चेअरपर्सन गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक फोटो समोर आला आहे. त्यामध्ये त्यांच्या डोक्यातून रक्त येताना दिसत आहे. त्यांना कोलकात्यातील SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री ममता आपल्या घरात ट्रेड मिल करताना कोसळल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीएम ममता बनर्जी यापूर्वीही अपघाताच्या शिकार झालेल्या आहेत.

 

याचवर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा रस्ते अपघात झाला होता. त्यावेळी त्या बर्धमानहून कोलकाताकडे परत येत होत्या. पावसामुळे ममता बनर्जी कारने परतत होत्या. त्यावेळी कारचा अर्जंट ब्रेक मारल्याने ममता बनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यातील अन्य एक कार अचानक समोर आल्याने चालकाला ब्रेक मारावा लागला होता.

IPL_Entry_Point