Utter pradesh viral news : उत्तर प्रदेशमधील अमरोहामध्ये एका नववधू सोबत असे काही घडले की मधूचंद्राच्या रात्री तिने नवऱ्याला सोडून थेट आपले घर गाठले. मधू चंद्राच्या रात्री नवरा हा दुसऱ्या समाजाचा असल्याची माहिती नवरीला मिळाली. यामुळे नववधूच्या रागाचा पारा चढला. आपली पासवणूक झाल्याचे समजताच सासरी तासभर थांबल्यावर तिने गोंधळ घातला. यानंतर तिने थेट घरातून बाहेर पडत माहेर गाठले. लग्न लावणाऱ्या मध्यस्थावरही तिने फसवणुक केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या तरुणाचे लग्न शहरातील दुसऱ्या वस्तीत राहणाऱ्या तरुणीसोबत एक वर्षापूर्वी ठरले होते. दोन्ही कुटुंबीय वेगवेगळ्या समाजातील असूनही मध्यस्थाने खोटे बोलून तरुण आणि तरुणीचे लग्न लावल्याचा आरोप आहे. २९ फेब्रुवारी रोजी धार्मिक विधींनी दोघांचाही विवाह सोहळा पर पडला. लग्नानंतर वधू सासरी पोहोचली तेव्हा तिचा नवरा दुसऱ्या जातीतील असल्याची माहिती तिला समजली. यानंतर संतापलेल्या नववधूने गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच तिच्या माहेरचे नातेवाईक देखील सासरी आले. यानंतर नवरीने सासरी राहण्यास नकार देत नवविवाहित वधू तासाभरात माहेरी परतली. कोणत्याही परिस्थितीत सासरी जाण्यास नकार दिला. शनिवारी काही नातेवाईकांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांमधील संपूर्ण वाद मिटवण्यात आला. यासंदर्भात प्रभारी निरीक्षक हरीश वर्धन यांनी माहिती नाकारली. चौकशी करून तक्रार आल्यावर कारवाई करू असे सांगितले.
मध्यस्थावर फसवणूक केल्याचा आरोप करत वधूच्या कुटुंबीयांनी खळबळ उडवून दिली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. लग्नसमारंभाला आलेले काही नातेवाईक वधूच्या सासरच्या घरीही थांबले होते. त्याने कसा तरी वधूच्या कुटुंबाला शांत केले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये लेखी करार करण्यात आला.