Viral Video : राजस्थानमधील एका तरुणीच्या व्हिडिओने इंटरनेटवर नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. पारंपारिक राजस्थानी पोशाख परिधान केलेल्या रंगाने सावळी असलेल्या या तरुणीच्या साधेपणाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. ज्योती असं या तरुणीचं नाव आहे. या तरुणीशी एका व्लॉगरनं संवाद साधला आहे. या तरुणीच्या डोक्यावर पदर असून ती उत्तर देतांना लाजत या पदराने तिचा चेहरा झकट आहे. तिचा हाच साधेपणाने नेटकऱ्यांना भुरळ घटली आहे. तिचा हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे.
ब्लॉगरशी बोलतांना या तरुणीने सांगितले की, पहिल्यांदाच कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे. सोशल मीडियावर लोक या तरुणीचा साधेपणा व तिचं सौंदर्य या दोन्ही गोष्टींचं कौतुक करत आहेत. अनेकांनी महिलेच्या डोळ्यांचं कौतुक केलं. तर एका युजरने म्हटले की, हे खरं भारतीय सौंदर्य आहे, जे कोणत्याही मेकअपने केलं जाऊ शकत नाही.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यटक या तरुणीसोबत सेल्फीही घेत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्लॉगर महिलेला विचारतो, तुला इंग्रजी कसं बोलायचं हे माहित आहे का? यावर ती महिला उत्तर देते की, तिला इंग्रजी येत नाही. तो म्हणतो की इथे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संबंधित बातम्या