मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Bbc Survey Income Tax Delhi Office Ends Around 60 Hours Latest Update

IT Raid BBC : तब्बल ६० तासांनंतर आयकर विभागाचे पथक BBC च्या दिल्ली व मुंबई कार्यालयातून बाहेर

IT Raid BBC
IT Raid BBC
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Feb 17, 2023 12:36 AM IST

income tax department Raid BBC : बीबीसीच्या मुंबई व दिल्ली कार्यालयातून आयकर विभागाचे पथक तब्बल ६० तासांनंतर बाहेर पडले आहे. त्यांनी काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

BBC Survey Ends:  राजधानी दिल्ली आणि मुंबईतील कलिना येथील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन (बीबीसी) कार्यालयात सुरू असलेले आयकर विभागाचे (income tax department) सर्वेक्षण गुरुवार रात्री संपले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी चौकशी सुरू केली होती. जी जवळपास ६० तास चालली. दिल्लीबरोबरच आयकर विभाग मुंबई येथील कार्यालयातही तीन दिवस सर्वेक्षण करत होता. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांची आर्थिक माहिती एकत्र केली. सर्वेक्षण करताना कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले होते.

ट्रेंडिंग न्यूज

मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचे पथक बीबीसीच्या (BBC) दिल्ली व मुंबई  कार्यालयात दाखल झाले होते.  आता ६० तासांनंतर आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले असून, बीबीसी कार्यालयून अधिकारी बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बीबीसी कार्यालयातून अनेक कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड ड्राइव्ह जप्त केले आहेत.

आयकर विभागाचे पथक आधी बीबीसीच्या मुंबई कार्यालयातून बाहेर पडून बॅलार्ड इस्टेट येथील सिंधिया हाऊस येथील मुख्यालयाकडे रवाना झाले. त्यानंतर काही वेळ दिल्लीतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण सुरू होते. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभाग बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांची पाहणी करत होते. अधिकाऱ्यांनी तीन दिवस कार्यालयातच ठाण मांडले होते. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयकर विभागाची टीम सर्वेक्षणासाठी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहोचली होती. जी गुरुवारी रात्री ९ वाजता बाहेर पडली. 

पथकाने बीबीसीच्या गेल्या १० वर्षातील व्यवहारांची माहिती घेतली. काही संगणक, हार्ड ड्राईव्ह व पेन ड्राईव्ह जप्त केले आहे. परदेशातील व्यवहारांची तपासणी केली जात आहे. 

WhatsApp channel

विभाग