पीएम मोदींवर बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) स्क्रीनिंगवरून वाद झाला असताना. आता दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही (Jamia millia islamia university) ते दाखवण्याचा विचार विद्यार्थी करत आहेत. जामियाच्या विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचे स्क्रीनिंग सायंकाळी ६ वाजता ठेवण्यात आले आहे. मात्र, जामिया मिलिया प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा जमाव एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. मंगळवारी रात्री जेएनयूमध्ये माहितीपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान दोन विद्यार्थी गटांमध्ये वाद झाला होता. वादानंतर दगडफेकीच्या घटनाही घडल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.
दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आज (बुधवार) संध्याकाळी ६ वाजता विद्यापीठ कॅम्पसमध्ये पीएम मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घोषणेनंतर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली आणि कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यास बंदी घातली. मंगळवारी रात्री जेएनयूमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जामिया प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सरकारचे सोशल साइट्सवरून माहितीपट ब्लॉक करण्याचे आदेश –
पीएम मोदींवर बनवलेली डॉक्युमेंट्री भारतात सोशल मीडिया साइट्सवर ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानंतर वाद वाढला होता. मंगळवारी जेएनयूमध्ये डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनावरून झालेला वाद इतका वाढला की दगडफेकही झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.
विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटरी दाखवल्याचे वृत्त जेएनयू प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केली होती. वीज खंडित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने लॅपटॉप आणि फोनवर पीएम मोदींवरील माहितीपट दाखवला. वीज खंडित झाल्यानंतर कॅम्पसमध्ये अंधार पडला आणि काही दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. डॉक्युमेंटरीचा दूरपर्यंत प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओचा क्यूआर कोडही वितरित केला.
संबंधित बातम्या