मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! सलून चालकाने घरात घुसून दोन मुलांचा वस्तऱ्याने चिरला गळा

धक्कादायक..! सलून चालकाने घरात घुसून दोन मुलांचा वस्तऱ्याने चिरला गळा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 20, 2024 12:06 AM IST

UP Crime News : एका सलून चालकाने वस्तऱ्याने २ लहान मुलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. हत्येचे कारण समोर आले नसून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना हत्येनंतर रक्तही प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सलूनचालकाने घरात घुसून दोन मुलांचा वस्तऱ्याने चिरला गळा
सलूनचालकाने घरात घुसून दोन मुलांचा वस्तऱ्याने चिरला गळा

उत्तरप्रदेशातील बदायूंमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सलून चालकाने वस्तऱ्याने २ लहान मुलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. दोघे सख्ख्ये भाऊ असून त्यांचा तिसरा भाऊ सलून चालकांच्या तावडीतून निसटल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेनंतर सलूनवाला घटनास्थळावरून पसार झाला. मृत मुलांचे वय ११ व ६ वर्षे आहे. 

दोन मुलांच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी परिसरात असलेले आरोपीचे सलूनचे दूकान फोडून आग लावली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ही घटना सिविल लाइन परिसरातील बाबा कॉलनीतील आहे. येथे कॉलनीत एक सलूनचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी आरोपी शेजारच्या महिलेसोबत बोलला. त्यानंतर तिच्या तीन मुलांना घेऊन घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथे त्याने मोठ्या व सर्वात लहान मुलांच्या गळ्यावर चाकू फिरवून त्यांची हत्या केली. मधला मुलगा त्याच्या तावडीतून सुटून पळाला. ओरडत वरती येऊन त्याने नातेवाईकांना ही घटना सांगितले. सर्व नातेवाईक तिसऱ्या मजल्यावर आल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. दोन लहान मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

सलूनवाल्याच्या कृत्याने संतप्त जमावाने त्याच्या दुकानाची तोडफोड करत रस्त्यावर जाळपोळ केली. परिसरात तनावाचे वातावरण असल्याने बाजार बंद करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार मुलांची हत्या केल्यानंतर त्यांचे रक्त प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी सखानू परिसरातील रहिवासी आहे. दोन मुलांची हत्या झाल्याचे समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

IPL_Entry_Point

विभाग