मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bar council : बार काउन्सिलचा मोठा निर्णय, आता परदेशी वकिलांनाही भारतात वकिलीची मुभा

Bar council : बार काउन्सिलचा मोठा निर्णय, आता परदेशी वकिलांनाही भारतात वकिलीची मुभा

Mar 15, 2023 09:15 PM IST

Bar council of india : बार काउन्सिल ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतपरदेशी वकील आणि कायद्याच्या फर्म्सना भारतातील न्यायालयात वकिली करण्याचीमुभा दिली आहे.

परदेशी वकिलांनाही भारतात वकिलीची मुभा
परदेशी वकिलांनाही भारतात वकिलीची मुभा

बार काउन्सिल ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतपरदेशी वकील आणि कायद्याच्या फर्म्सना भारतातील न्यायालयात वकिली करण्याचीमुभा दिली आहे. कायद्याचा अभ्यास केलेल्या परदेशी व्यक्तींना भारतात वकिली करण्यासंबंधीची नियमावली जारी केली आहे. यामध्येविविध प्रकारचे परदेशी कायदे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांचा समावेशकरण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या धोरणाचा देशातील कायदेशीर खटल्यांवर परिणाम होणार नाही. हिंदुस्थानातील वकिलांच्या फायद्यासाठी परदेशी कायद्यातील खटले,आंतरराष्ट्रीय कायदेशीर समस्या आणि आंतरराष्ट्रीय लवाद प्रकरणांमध्ये परदेशी वकिलांसाठी देशात वकिलीला परवानगी दिल्‍याने देशांतर्गत कायदेशीर व्यवसाय विकसित करण्यास मदत होईल,असा विश्वास बीसीआयने व्यक्त केला आहे.परदेशी कायद्यांच्या प्रॅक्टिस करण्यासाठी परदेशी वकिलांना संधी देणं,दिवाणी खटले आणि कायद्यांचं उल्लंघन याबाबतचे नियम या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

बार कौन्सिल ऑफ इंडियाचा सुरुवातीला विदेशी वकील आणि परदेशी कायदा संस्थांना देशात कोणत्याही स्वरूपात प्रवेश देण्यास विरोध होता.२००७-२०१४ या वर्षांमध्‍ये बार काउन्सिलने देशभरातील राज्य बार कौन्सिल आणि इतर भागधारक यांच्यातील संयुक्त सल्लागार परिषदांमध्ये परदेशी वकिलांसाठी देशात प्रॅक्टीस करण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा सुरू होती, आता याला मंजुरी देण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग