मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bank of Maharashtra Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या निवड प्रक्रिया आणि पगार

Bank of Maharashtra Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या निवड प्रक्रिया आणि पगार

Jun 25, 2024 11:12 PM IST

Bank Of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Bank Job 2024: बँक ऑफ महाराष्ट्रने आंतरबँक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या महिला खेळाडूंसाठी नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत. ही भरती प्रक्रिया विशेषतः व्हॉलीबॉल खेळणाऱ्या महिलांसाठी आहे. बँकेने लिपिक पदासाठी १२ रिक्त पदांची घोषणा केली. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या पदासाठी अर्ज करण्याची इच्छुक उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईट www.bankofmaharashtra.in वर भेट देऊ शकतात. दरम्यान, २२ जून २०२४ पासून भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, ८ जून २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बँक ऑफ महाराष्ट्र लिपिक भरती २०२४: पात्रता

बँक ऑफ महाराष्ट्राच्या लिपिक पदासाठी उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण पाहिजे किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष पात्रता असावी. या पदासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे ते कमाल २४ वर्षे असावे.

बँक ऑफ महाराष्ट्र लिपिक भरती २०२४: निवड प्रक्रिया

या पदासाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यात होईल. सर्वप्रथम, उमेदवाराला ५० गुणांची लेखी चाचणी उतीर्ण व्हावी लागेल. यानंतर ५० गुणांची शारीरिक चाचणी देखील द्यावी लागेल.

बँक ऑफ महाराष्ट्र लिपिक भरती २०२४: वेतन आणि भत्ते

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक पदासाठीचे वेतन २४ हजार ५० ते ६४ हजार ४४० रुपये असेल. मूळ वेतन 24,050 रुपये आहे. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पगारासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, सीसीए आणि वैद्यकीय यासह इतर भत्ते देखील मिळतील.

बँक ऑफ महाराष्ट्र लिपिक भरती २०२४: अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या https://bankofmaharashtra.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यानंतर, त्यांना त्याची प्रिंटआउट घ्यावी लागेल आणि पुढील पत्त्यावर पाठवावी लागेल. महाव्यवस्थापक, एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआर विभाग, लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे- ४०११००.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर