Bank Holidays in September 2024 : ऑगस्ट महिना संपत आला असून सर्वांना गणेशोत्सवाचा महिना असलेल्या सप्टेंबरचे वेध लागले आहेत. या महिन्यात गणेशोत्सवाबरोबरच इतरही अनेक सण असल्यानं सुट्ट्यांची रेलचेल आहे. या महिन्यात बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत.
सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यात प्रादेशिक आणि धार्मिक उत्सव आहेत. त्याशिवाय दोन शनिवार आणि पाच रविवार सुट्टी असणार आहे. भारतातील बँकांच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत. आठवड्याच्या सुट्टीसह कमीतकमी १४ सुट्ट्या आहेत. माहितीसाठी वेळीच आपल्या स्थानिक बँकेच्या शाखेशी सुट्टीच्या यादीची माहिती घेऊन त्यानुसार बँकेशी संबंधित कामाचं नियोजन करणं उपयुक्त ठरेल.
१ सप्टेंबर - रविवार - संपूर्ण भारत
७ सप्टेंबर - विनायक चतुर्थी - संपूर्ण भारत
८ सप्टेंबर - रविवार / नुआखाई - संपूर्ण भारत / ओडिशा
१३ सप्टेंबर - रामदेव जयंती / तेजा दशमी (शुक्रवार) - राजस्थान
१४ सप्टेंबर - दुसरा शनिवार / ओणम - संपूर्ण भारत / केरळ
१५ सप्टेंबर - रविवार / तिरुवोणम - संपूर्ण भारत / केरळ
१६ सप्टेंबर - ईद ए मिलाद (सोमवार) - संपूर्ण भारत
१७ सप्टेंबर - इंद्र जत्रा (मंगळवार) - सिक्कीम
१८ सप्टेंबर - श्री नारायण गुरु जयंती (बुधवार) - केरळ
२१ सप्टेंबर - श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) - केरळ
२२ सप्टेंबर - रविवार - संपूर्ण भारत
२३ सप्टेंबर - वीर बलिदान दिन (सोमवार) - हरियाणा
२८ सप्टेंबर - चौथा शनिवार - संपूर्ण भारत
२९ सप्टेंबर - रविवार - संपूर्ण भारत
ग्राहकांना रोखीची चणचण भासू नये म्हणून सर्व बँका सुट्ट्यांच्या दिवशी ऑनलाइन सेवा देतात. त्यात वेबसाइट आणि मोबाइल बँकिंग सेवेचाही समावेश असतो. पैसे काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करू शकता.
बँकांच्या वार्षिक सुट्टीचे कॅलेंडर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नेगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स अॅक्टच्या तरतुदींनुसार जाहीर करते. धनादेश किंवा प्रॉमिसरी नोट सारख्या सेवा या दिवशी उपलब्ध नसतात.
रिझर्व्ह बँक आणि राज्य सरकारे राष्ट्रीय आणि स्थानिक सण-उत्सव, इतर गरजा, धार्मिक उत्सव आणि इतर सांस्कृतिक विधी विचारात घेऊन बँकांच्या सुट्ट्यांची यादी तयार करतात. मध्यवर्ती बँक आपल्या अधिकृत वेबसाइट आणि बँका आणि इतर वित्तीय संस्थांना सूचनांद्वारे ही घोषणा करते.