Shanto Khan Selim Khan: बांगलादेशची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. येथे २० अवामी लीग नेत्याची हत्या करण्यात आली आहे. ताजी घटना मॉब लिंचिंगची आहे. याचे शिकार देशातील प्रसिद्ध अभिनेते शांतो खान आणि त्यांचे वडील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोघे जीव वाचवण्यासाठी देशातून पळून जात होते, त्याचवेळी जमावाने त्यांना पकडले व बेदम मारहाण करत त्यांना ठार केले. या घटनेमुळे पश्चिम बंगाल आणि चित्रपट विश्वात शोककळा पसरली आहे. बांगलादेशमध्ये (bangladesh News) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सोमवारी अभिनेते खान तसेच त्याचे वडील सलीम खान यांना जमावाने ठार मारले आहे. सलीम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. डेली सनने दिलेल्या माहितीनुसार शांतो आणि सलीम जीव वाचवण्यासाठी पळून जात होते. त्यावेळी ते बलिया यूनियनच्या फरक्काबाद बाजारात सुरु असलेल्या हिंसाचारात अडकले. दोघे बागारा बाजारात पोहोचल्यानंतर जमावाने त्यांना घेरले.
सांगितले जात आहे की, जमावापासून वाचण्यासाठी दोघांनी आपल्या जवळ असलेल्या बंदुकीतून गोळ्याही झाडल्या. मात्र त्यानंतर जमाव त्यांच्यावर तुटून पडला व दोघांना ठार केले. त्यांनी 'Tungi Parar Miya Bhai' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.. हा चित्रपट बांगलादेशचे राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित होती.
शापला मीडिया नावाने कंपनी चालवणाऱ्या सलीम यांनी शहंशाह, बिद्रोही सारख्या चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. पद्म मेघना नदीतून अवैध रित्या वाळू उत्खनन केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले होते. या प्रकरणात त्यांना तुरुंगातही टाकले होते. ACC म्हणजेच एंटी करप्शन कमीशनमध्ये त्यांच्याविरोधात अजूनही खटला सुरू आहे. त्याचबरोबर एसीसीने शांतो यांच्या विरोधात अवैध पद्धतीने संपत्ती जमा केल्याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती.
माध्यमांशी बोलताना फिल्म प्रोड्यूसर अरिंदम यांनी सांगितले की, सोमवारीच त्यांचे सलीम खान यांच्याशी बोलणे झाले होते. त्यानंतर काही तासातच कमांडोचे डायरेक्टर शमीम अहमद रॉनी यांनी मला अमेरिकेतून फोन करून विचारले की, काय माहिती मिळाली का, त्यांनी म्हटले की, सलीम यांच्याबाबतचे वृत्त ऐकून त्यांचे हात कापत आहेत. जेव्हा मला ही बातमी मिळाली मी सुन्न झालो.