राष्ट्रपतींच्या बहिणीपासून मंत्र्यांच्या पत्नीसोबत अनेक महिलांशी शारीरिक संबंध, अधिकाऱ्याचे ४०० सेक्स व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रपतींच्या बहिणीपासून मंत्र्यांच्या पत्नीसोबत अनेक महिलांशी शारीरिक संबंध, अधिकाऱ्याचे ४०० सेक्स व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रपतींच्या बहिणीपासून मंत्र्यांच्या पत्नीसोबत अनेक महिलांशी शारीरिक संबंध, अधिकाऱ्याचे ४०० सेक्स व्हिडिओ व्हायरल

Nov 07, 2024 06:03 PM IST

Ebang Engonga Viral News: राष्ट्रपतींच्या बहिणीपासून मंत्र्यांच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अधिकाऱ्याचे ४०० सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे.

राष्ट्रपतींच्या बहिणीपासून मंत्र्यांच्या पत्नीसोबत ठेवले शारीरिक संबंध
राष्ट्रपतींच्या बहिणीपासून मंत्र्यांच्या पत्नीसोबत ठेवले शारीरिक संबंध

मध्य आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अधिकाऱ्याचे सुमारे ४०० सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.संबंधित अधिकारी राष्ट्रीय वित्तीय अन्वेषण यंत्रणेचा (एएनआयएफ) संचालक आहे, ज्याचे नाव एबांग एन्गोंगा आहे. वेगवेगळ्या महिलांसोबत ती व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे, ज्याचे वेगवेगळ्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एबांग एन्गोंगा यांनी ज्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत, त्यात राष्ट्राध्यक्षांची बहीण आणि चुलत बहीण, २० हून अधिक मंत्र्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांचा समावेश आहे. हे तर काहीच नाही, एबांग एन्गोंगा यांनी आपल्या भावाच्या पत्नीला आणि पोलीस महासंचालकांच्या पत्नीलाही सोडले नाही. याशिवाय त्याचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांशीही लैंगिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश व्हिडिओ अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात रेकॉर्ड करण्यात आले आहेत, जिथे एबांग एन्गोंगा यांचे कार्यालय होते. एबांग एन्गोंगा स्वतःही विवाहित आहे.

वेगवेगळ्या महिलांशी संबंध ठेवतानाचे व्हिडिओ

एबांग एन्गोंगा वेगवेगळ्या महिलांशी संबंध ठेवतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर तिथले सरकार हादरले आहे. उपराष्ट्रपती टिओडोरो न्गुएमा ओबियांग मँग्यू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर घोषणा केली की, सरकार आचारसंहिता आणि सार्वजनिक नैतिकता कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दोषी आढळलेल्या सर्वांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल

अधिकाऱ्यांशी संबंधित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. संबंधित अधिकारी आणि सरकारी यंत्रणेत तैनात असलेल्या अधिकारी आणि नेत्यांच्या बदनामीमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनले आहे. गेल्या आठवड्यात उपराष्ट्राध्यक्ष ओबियांग यांनी इक्वेटोरियल गिनीच्या दूरसंचार मंत्रालयाला सोशल मीडियावर फिरणाऱ्या अश्लील व्हिडिओंचा प्रसार रोखण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली, कारण या व्हिडिओमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

सर्वप्रथम व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे व्हिडिओ सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये व्हायरल झाले आहेत. त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि एक्सवर पोस्ट करण्यात आले. अय्याश अधिकारी एबांग एन्गोंगा यांनी स्वत:च्या कार्यालयात ४०० हून अधिक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. सेंट्रल आफ्रिकन इकॉनॉमिक अँड मॉनेटरी कम्युनिटी कमिशनचे अध्यक्ष बाल्टासर एन्गोंगा अडजो यांचे ते चिरंजीव आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर