देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ काश्मीरमधील राजौरी येथे बनवण्यात आलेले स्मारक बलिदान स्तंभ तयार झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी हा स्तंभ जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. ओवैस अहमद यांनी यांनी मंगळवारी दिली. बलिदान स्तंभ १९४७ मधील पाकिस्तानच्या काळ्या कृत्याची आठवण देतो. जेव्हा सीमापार आलेल्या घुसखोरांनी (कबायली) जम्मू काश्मीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी शेकडो महिलांची इज्जत लुटली आणि ३० हजार लोकांचे हत्याकांड केले.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना श्रीनगर महानगर पालिकेचे आय़ुक्त ओवैस अहमद यांनी म्हटले की, आम्ही १५ ऑगस्टपर्यंत बलिदान स्तंभ तयार करण्याचे नियोजन केले होते. आता हा स्तंभ बांधून तयार झाला आहे. लोकांना आमचे आवाहन आहे की, त्यांनी या स्थानावर येऊन महान नायकांना श्रद्धांजली अर्पण करावी. वृत्तसंस्था काश्मीर न्यूज कॉर्नर (केएनसी) नुसार, एसएमसी आयुक्ताने म्हटले की, या स्थानी येण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही. या प्रकल्पासाठी एकूण ४.८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
बलिदान स्तंभाची कथा आपल्याला स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या काळ्या कृत्याची आठवण करून देते. जेव्हा इंग्रजांनी देश सोडण्याच्या आधी भारत आणि पाकिस्तान दोन देशांची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या शहरांवर व राज्यांवर अवैधपणे कब्जा करण्यास सुरूवात केली. त्यांनी हैदराबाद, जूनागड (आता गुजरात) आणि काश्मीरवर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. २६ ऑक्टोबर १९४७ मध्ये जम्मू काश्मीरचे तत्कालीन राजा हरि सिंह संभ्रमात होते, मात्र जेव्हा पाकिस्तानी सैनिकांच्या वेशभूषेत कबायलींनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा राजा हरि सिंह यांनी घाईगडबडीत भारतात विलिनीकरणाची घोषणा केली. राजा हरि सिंह यांच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी २७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. पाकिस्तानच्या सैनिकांनी काश्मीरमध्ये घुसताच लोकांचे हत्याकांड करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानच्या सैनिकांनी जे दिसेल त्याला ठार मारायला सुरूवात केली.
पाकिस्तानी लोकांचा अत्याचार इतका भयावह आणि बीभत्स होता की, महिलांची इज्जत लुटली. जेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यानंतर पहिली दिवाळी साजरी करत होता, तेव्हा राजौरीत पाकिस्तानी काश्मिरींवर अत्याचार करत होते. महिलांनी आपली अब्रु वाचवण्यासाठी विष प्राशन केले. अनेक महिला विहिरीत पडल्या. या हत्याकांडात ३० हजार लोकांना ठार मारले. त्याच स्थानावर आता बलिदान स्तंभ बनून तयार झाला आहे. याचे पहिल्यादा निर्माण १९६९ मध्ये झाले होते.