मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'कब्रस्तान नव्हे हे तर महाभारत कालीन...', ज्ञानवापीनंतर हिंदू पक्षाच्या आणखी एका लढ्याला यश, ५३ वर्षानंतर निकाल

'कब्रस्तान नव्हे हे तर महाभारत कालीन...', ज्ञानवापीनंतर हिंदू पक्षाच्या आणखी एका लढ्याला यश, ५३ वर्षानंतर निकाल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 06, 2024 12:01 AM IST

Baghpat Lakshagrah : बागपतयेथील लाक्षागृहआणि कब्रस्तानवादावर न्यायालयाने निकाल दिला असून हा निकालहिंदू पक्षकारांच्या बाजुने लागला आहे.

Baghpat Lakshagrah
Baghpat Lakshagrah

उत्तरप्रदेशमधील बागपत येथील लाक्षागृह आणि कब्रस्तान वादावर न्यायालयाने निकाल दिला असून हा निकाल हिंदू पक्षकारांच्या बाजुने लागला आहे. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, हे ठिकाण कब्रस्तान नव्हे तर महाभारत कालीन लाक्षागृह आहे. या निकालावर हिंदू पक्षकारांनी म्हटले की, लाक्षागृहाचे वर्णन महाभारतात येते. हा महाल पांडवांना जिवंत जाळण्यासाठी बनवला गेला होता.

दरम्यान, सिविल कोर्टात मुकीम खान व अन्य काही याचिकाकर्त्यांनी केस दाखल करत दावा केला होता की, ही जमीन कब्रस्तानची आहे. यावर १९७० पासून खटला सुरू आहे. त्यानंतर हा खटला १९९७ मध्ये बागपतकडे स्थानांतरित करण्यात आला. आता ५३ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल हिंदूंच्या बाजुने लागला आहे. हिंदू पक्षाच्या वकीलाने सांगतले की, आपल्या निकालात कोर्टाने म्हटले की, हे कोणतेही कब्रस्तान नव्हे तर लाक्षागृह आहे आणि हे महाभारत कालीन आहे. घटनास्थळी जे प्राचीन शिलालेख मिळाले आहेत, त्यातून हे स्पष्ट होते की, हे कब्रस्तान नाही.

त्यांनी सांगितले की, जेव्हा मुगल येथे आले व त्यांनी तोडफोड करून आपल्याला हवी तशी ठिकाणे बनवली. प्राप्त पुराव्यानंतर कोर्टाला समजले की, येथे कोणतेही कब्रस्तान नाही. ही १०८ बीघा जमीन म्हणजेच जवळपास पाच एकर जमीन आहे. येथे एक उंच टेकडी आहे. येथे पांडव आले होते. त्यांना जिवंत जाळून मारण्यासाठी एक लाखामंडप बनवला गेला होता. रेवेन्यू कोर्टातही  लाखामंडपाची नोंद आहे.

हे ठिकाण हिंदुचे तीर्थस्थल राहिले आहे - 

हिंदू पक्षाचे वकील रणवीर सिंह तोमर यांनी सांगितले की, कोर्टाने पुराव्यानंतर हा निकाल दिला की, येथे कब्रस्तान नाही. येथे १०८ बीधा जमीन असून त्यावर एक उंच टेकडी आहे. महसूल न्यायालयानेही ही जमीन लाखामंडप नावाने रजिस्टर अस्ल्याचे सांगितले. हे ठिकाण प्राचीन काळापासून हिंदूसाठी तीर्थस्थळ राहिले आहे.

WhatsApp channel

विभाग