UPSC CSE Result : देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची UPSC परीक्षेत बाजी, क्रिकेटवरील गुगलीवर दिलं हटके उत्तर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPSC CSE Result : देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची UPSC परीक्षेत बाजी, क्रिकेटवरील गुगलीवर दिलं हटके उत्तर

UPSC CSE Result : देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची UPSC परीक्षेत बाजी, क्रिकेटवरील गुगलीवर दिलं हटके उत्तर

Apr 17, 2024 07:54 PM IST

UPSC CSE Result 2023: कुहू गर्गचे प्राथमिक शिक्षणसेंट जोसेफस्कूल डेहरादूनमधून झाले.तिनेदिल्लीतीलएसआरसीसी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.कुहूने यूपीएससीची तयारी करताना रोज १६-१६ तास अभ्यास केला. काही विद्यार्थी ८ तास अभ्यास करूनयूपीएससी क्लियर करतात आणि तिनेही काही दिवस ८ ते १० तास अभ्यास केला.

देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची  UPSC परीक्षेत बाजी
देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची  UPSC परीक्षेत बाजी

Upsc success story :  उत्तराखंड राज्याचे माजी डीजीपी अशोक कुमार यांची मुलगी कुहू गर्ग हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत १७८ व्या रँक मिळवून मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे कुहूनेबॅडमिंटन (Badminton player Kuhoo garg ) खेळात देशाचे नाव उज्जल केले आहे. ५६ ऑल इंडिया मेडल्स आणि १८ इंटरनॅशनल मेडल्स कुहूच्या नावावर आहेत. तिचे बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत टॉप इंटरनॅशनल रॅक ३४ आणि देशात मिक्स डबल्स रँकिंग नंबर १ आहे.

माध्यमांशी संवाद साधताना कुहू गर्गने आपल्या यशाचे श्रेय माजी आयपीएस अधिकारी असलेले वडील अशोक कुमार यांना दिले. तिने सांगितले की, खेळात झालेल्या दुखापतीदरम्यान केलेली मेहनत आणि बॅडमिंटन खेळाने शिकवलेली शिस्त पुढे जाऊन यूपीएससीतील यशाचे गमक बनले. 

कुहू गर्गचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ डेहरादूनमधून झाले. तिने दिल्लीतील एसआरसीसी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.  कुहूने यूपीएससीची तयारी करताना रोज १६-१६ तास अभ्यास केला. काही विद्यार्थी ८ तास अभ्यास करून यूपीएससी क्लियर करतात आणि तिनेही काही दिवस ८ ते १० तास अभ्यास केल्याने सांगितले.

क्रिकेटबाबत मुलाखतीत विचारला प्रश्न - 

यूपीएससीच्या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आले होते की, क्रिकेटमुळे देशातील अन्य खेळ प्रकारांची हानी होत आहे का? क्रिकेटला एक इंडस्ट्री बनवले पाहिजे का? याचे उत्तर देताना कुहूने म्हटले की, क्रिकेटचा कोणत्याही अन्य खेळांवर परिणाम होत नाही. तर देशात क्रिकेटचा विस्तार होत आहे. त्याच पद्धतीने अन्य खेळही चांगले होऊ शकतात. 

बॅडमिंटनने शिकवली चिकाटी - 

कुहूने सांगितले की, कुटूबाशिवाय मित्रपरिवार व सोसायटीत राहत असलेल्या अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिला खूप मदत केली व मार्गदर्शन केले. तिने म्हटले की, जर ती बॅडमिंटन (Badminton) खेळाडू नसती तर कदाचित यूपीएससी क्लियर करण्यासाठी चिकाटीने मेहनत करण्याची शक्ती मिळाली नसती. कुटूंबाच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही परीक्षा कठीण होऊन बसते.

वडीलIPS आणि आई प्रोफेसर - 

कुहू गर्गचे वडील अशोक कुमार २०२०-२३ पर्यंत उत्तराखंडचे डीजीपी होते. अशोक कुमार यांनी हरियाणामधून प्राथमिक शिक्षण घेतले व आयआयटी दिल्लीमधून इंजीनीरिंग केले होते. तर कुहूची आई प्रोफेसर अलकनंदा अशोक पंत विद्यापीठात कार्यरत असून कुहूला दोन भाऊ असून ते शिक्षण घेत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर