मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: चमत्कार की आजार? महिलेनं दिला शेपूट असलेल्या बाळाचा जन्म, पाहून डॉक्टर आश्चर्यचकीत!

Viral News: चमत्कार की आजार? महिलेनं दिला शेपूट असलेल्या बाळाचा जन्म, पाहून डॉक्टर आश्चर्यचकीत!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 18, 2024 04:17 PM IST

Baby Born With Tail: चीनमध्ये एका महिलेने ४ इंच लांब शेपूट असलेल्या बाळाला जन्म दिला आहे.

Baby (Represantative Image)
Baby (Represantative Image) (freepik)

Viral News: चीनमधून सर्वांना आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली. एका महिलेने ४ इंच लांब शेपूट असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. हे पाहून डॉक्टर देखील शॉक झाले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. चीनमधील हांगझू चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बालरोग ऑन्कोलॉजीचे उपाध्यक्ष डॉ. ली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या बाळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये.

डॉ. ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भात असताना बाळाचा पूर्णपणे विकास झाला नाही. या बाळाच्या पाठीच्या कण्यामध्ये काही समस्या असू शकतात. यामुळे शेपटी तयार झाली असावी, असा त्यांना संशय होता. एमआरआय स्कॅन केल्यानंतर त्याचा संशय खरा ठरला.

जन्मलेल्या बाळाची शेपूट १० सेंटीमीटर म्हणजेच ३.९ इंच आहे. जेव्हा पाठीच्या कण्याची हड्डी असामान्य असते, तेव्हा पाठीच्या कण्याची हालचाल कमी होते. ज्यामुळे विविधविविध न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण करू शकते.

हे दुर्मिळ प्रकरण चीनच्या टीकटॉकवर चर्चेचा विषय बनला आहे. या दुर्मिळ बाळाचा व्हिडिओ ११ मार्च २०२४ रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या व्हिडिओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक जणांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग