Viral News : आई-वडील गोरे पण मूल काळे कसे ? नवऱ्याला बसला मोठा धक्का! पितृत्व चाचणीची केली मागणी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : आई-वडील गोरे पण मूल काळे कसे ? नवऱ्याला बसला मोठा धक्का! पितृत्व चाचणीची केली मागणी

Viral News : आई-वडील गोरे पण मूल काळे कसे ? नवऱ्याला बसला मोठा धक्का! पितृत्व चाचणीची केली मागणी

Nov 19, 2024 01:08 PM IST

Viral News : चीनमध्ये एक अजब घटना घडली आहे. एका पती पत्नीला मूल झालं. मात्र, ते काळ्या रंगाचं झाल्याने पतीने पत्नीवर संशय घेत पितृत्व चाचणी चीमागणी केली आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

आई-वडील गोरे पण मूल काळे कसे ? नवऱ्याला बसला मोठा धक्का! पितृत्व चाचणीची केली मागणी
आई-वडील गोरे पण मूल काळे कसे ? नवऱ्याला बसला मोठा धक्का! पितृत्व चाचणीची केली मागणी

Viral News : चीनमध्ये एक अजब घटना घडली आहे. नवजात बाळाचा रंग काळा असल्यानं चिनी दाम्पत्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. रिपोर्टनुसार, पती व पत्नी दोघेही गोरे आहे. मात्र, या दाम्पत्याला नुकतेच एक मूल झाले असून त्याचा रंग काळा असल्याने  आईच्या आनंदावर विरजण पडलं आहे. तर पतीला देखील पत्नीच्या चारित्र्यावर  संशय आला असून हे मूल त्याचे नसल्याचे म्हणत त्याने पितृत्व चाचणीची मागणी केली आहे. शांघाययेथील ३० वर्षीय महिलेने सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती दिल्यावर ही बातमी व्हायरल झाली आहे.  या महिलेने सी-सेक्शनच्या माध्यमातून बाळाला जन्म दिल्याचं अहवालात म्हटलंन आहे. पण जेव्हा दोघांनी  आपल्या मुलाच्या त्वचेचा रंग पाहिला तेव्हा त्याला धक्का बसला.

रिपोर्टनुसार, पहिल्या नजरेत बाळाला पाहिल्यावर पतीला संशय आला होता. त्याने लहान मुलाला जवळ घेण्यास देखील नकार दिला.  मुलाचा काळा रंग पाहून त्याला धक्काच बसला असल्याचं सांगितले जात आहे. यामुळे ती महिलाही नाराज असून हे कसे घडले या बाबत तिला देखील धक्का बसला आहे. यावर तीला विचारले असता तिने  "मी कधीच आफ्रिकेत गेले  नाही आणि कोणत्याही कृष्णवर्णीय लोकांना देखील मी ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुलाचा रंग नेमका काळा कसा काय झाला यामुळे ती गोंधळलेली आहे.  "मुलाच्या जन्माने माझ्या नवऱ्याला आनंद व्हायला हवा होता, पण तो त्याचा रंग काळा असल्याने  रागावला आहे. त्याची प्रतिक्रिया अस्वस्थ करणारी आहे, असे पत्नीने म्हटलं आहे. 

पितृत्व चाचणीची  पतीची मागणी 

महिलेचा नवरा हा पितृत्व चाचणीच्या मागणीवर ठाम आहे. मुलाच्या आईला या मुळे  फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. पण ती देखील पितृत्व चाचणीसाठी  तयार झाली आहे. यातून सत्य नक्कीच बाहेर येईल, असं ती म्हणाली. पण आता तिचा तिच्या नवऱ्यावरील विश्वास उडाला आहे. या महिलेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

इंटरनेट युजर्सनी  नवजात मुलाची त्वचा काळी पडणे सामान्य असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही असे देखील काहींनी म्हटलं आहे. मूल जसजसे मोठं होतं तसतसा त्वचेचा रंग हळूहळू बदलतो असे देखील काहींनी म्हटलं आहे.  काही युजर्सनी महिलेच्या पतीला फटकारलं असून त्याला अज्ञानी म्हटलं आहे. अशा वेळी पतीने पत्नीला पूर्ण सहकार्य करावे, असे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.  पत्नीवर संशय घेणे आणि तिला  त्रास देणे चुकीचे आहे, असे काहीनी म्हटलं आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर