मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ramdev Baba : रामदेव बाबाची मादाम तुसाद म्यूझिअममध्ये एंट्री.. पुतळ्याचे दिल्लीत अनावरण, ओळखा पाहू खरे कोणते?

Ramdev Baba : रामदेव बाबाची मादाम तुसाद म्यूझिअममध्ये एंट्री.. पुतळ्याचे दिल्लीत अनावरण, ओळखा पाहू खरे कोणते?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 30, 2024 05:33 PM IST

Ramdev Baba Wax Statue in Madame tussauds: योग गुरु बाबा रामदेवयांनी मंगळवारीदिल्लीत एकाकार्यक्रमात आपल्या मेणाचे पुतल्याचे अनावरण केले.रामदेव बाबाचा हा पुतळान्यूयॉर्कमधील मादामतुसाद म्यूझिअममध्ये ठेवला जाणार आहे.

Ramdev Baba Wax Statue
Ramdev Baba Wax Statue

अमेरिकेतील मादाम तुसाद म्यूझियममध्ये योग गुरू बाबा रामदेव यांचा मेणाचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत एका कार्यक्रमात खुद्द योगगुरू बाबा रामदेवयांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी पतंजली योगपीठचे सह संस्थापक आचार्य बालकृष्ण उपस्थित होते

२०० मूर्तीकारांनी बनवला पुतळा -

स्वामी रामदेव बाबांचा पुतळा बनवण्यासाठी २०० मूर्तीकारांनी काम केले आहे. आपल्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर बाबा रामदेव यांनी म्हटले की, या पुतळ्यावर असे व्रण आहेत, जे मला वयाच्या आठव्या वर्षी झालेल्या एका घावाचे निशाण आहेत. जगातील लोकांना अशा आदर्श व्यक्तीमत्वांकडून शिकायला मिळावे यासाठी म्युझियममध्ये पुतळे लावले जातात. सिंगापूरमधून या म्युझियमचे शिल्पकार सतत भारतात येत होते व माझ्या आकारात व रंगात काही बदल तर झाले नाहीत ना, याचे परीक्षण करत होते. पुतळ्याच्या शरीरावर लाखो केस हाताने लावले आहेत.

पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर, बाबा रामदेव यांनी पुतळ्याच्या कपाळावर गंध लावले आणि हुबेहूल पुतळ्याप्रमाणे पोजही दिली. बाब रामदेव यांनी दिलेली पोज एवढी हुबेहूब होती की, खरे बाबा रामदेव कोण? असा प्रश्न पडावा! या समारंभानंतर आता ती न्यूयॉर्कला पाठवण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती, संन्यास आणि सनातन योग परंपरेसाठी जागतिक प्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षण आहे. असे पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी म्हटले आहे.

मादामतुसाद म्यूझियममध्ये आतापर्यंत भारतातील अनेक दिग्गज व्यक्तीचे मेणाचे पुतळे लावले आहेत. यामध्ये भगत सिंह, इं दिरा गांधी, महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, मिल्खा सिंह, मेरीकोम, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, ऐश्वर्या राय,शाहरुख खान, सलमान खान, आणि रितिक रोशन यांचा समावेश आहे. रामदेव बाबा पहिलेच संन्यासी आहेत. त्यांचा पुतळा संग्रहालयात लावला जाणार आहे.

WhatsApp channel

विभाग