योगगुरु बाबा रामदेव उद्या (शुक्रवार) पत्रकार परिषद घेणार असून त्यात ते पतंजली उद्योग समुहाच्या पाच मोठ्या आयपीओची घोषणा करणार आहेत. यावेळी ते पतंजली समुहातील ५ कंपन्यांच्या आयपीओ योजनेवर सविस्तर माहिती देणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत योगगुरु रामदेव बाबा यांनी सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद,पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसीनशिवाय पतंजली लाइफस्टाइल आदिचे आयपीओ लाँच करण्याची योजना आहे. रामदेव बाबा यांच्या योजनेनुसार या कंपन्या येत्या पाच वर्षात शेअर बाजार लिस्टेड होतील.
रामदेवबाबा यांची एकमेव कंपनी Patanjali Foods शेअर बाजारमध्ये लिस्टेड आहे. मात्र या कंपनीचा आयपीओ रामदेव यांच्या नेतृत्वात आला नव्हता. काही महिन्यापूर्वी रुचि सोया नावाने लिस्टेड या कंपनीला पतंजली आयुर्वेदने २०१९ मध्ये समाधान प्रक्रिये अंतर्गत ४,३५० कोटी रुपयांत खेरदी केले होते. ही कंपनी आधीपासूनच शेअर बाजारात लिस्टेड होती.
उद्याच्या पत्रकार परिषदेचा अजेंडा पतंजली विरुद्ध अफवा पसरवणाऱ्यांना एक्सपोज करणेही आहे. त्याचबरोबर रामदेव पतंजली समूहाचे व्हिजन आणि मिशन २०२७ ची रूपरेषा तयार करतील. दरम्यान भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने पतंजली समूहाच्या योगदानाबाबत येत्या ५ वर्षातील ५ प्रमुख लक्ष्य व प्राधान्यक्रम सांगितले जातील.
संबंधित बातम्या