रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ?

रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ?

Feb 02, 2025 10:14 AM IST

Ramdev Baba News : रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाने दणका दिला आहे. पलक्कड जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबा आणि बाळकृष्ण या दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ?
रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ? (PTI)

Ramdev Baba News : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. केरळमधील न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. रामदेव बाबा यांच्यासह पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे. एका खटल्या प्रकरणी हे दोघे  अनुपस्थिती राहिल्यामुळे पलक्कड जिल्हा न्यायालयाने दोघांविरुद्ध वॉरंट जारी केले. केरळ ड्रग इन्स्पेक्टरने दिव्य फार्मसीविरोधात दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात हे दोघेही गैर हजर होते.

न्यायालयाने या दोघांना  १५ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोघेही न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी न्यायालयाने या दोघांविरोधात १ फेब्रुवारी रोजी जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, जेणेकरून ते न्यायालयात हजर राहू शकतील. दिव्य फार्मसीने दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिराती प्रसारित केल्याप्रकरणी केरळ ड्रग इन्स्पेक्टरने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडवर अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये भ्रामक जाहिरात, अवमान आणि ट्रेडमार्क उल्लंघन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीला दिलासा दिला आहे. मात्र, पुन्हा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा देखील न्यायालयाने दिला होता.

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणात बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडची माफी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. या प्रकरणी मानहानीचा खटला बंद करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीला कापूरआधारित उत्पादनांची विक्री करण्यापासून रोखल्याबद्दल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बाबा रामदेव यांच्यावर कोविड-१९ बरा करण्याचा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी ठरवल्याचा आरोप केला होता.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर