anand mahindra : महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी सोशल मिडीवर पोस्ट केलेल्या एक व्हिडिओची चर्चा होत आहे. त्यांनी बीटेक झालेल्या एका पाणी पुरी विकणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही तरुणी थेट महिंद्रा थारला तिचा पाणीपुरीचा गाडा लावून विक्री करते. तिने या व्यवसायाच्यावर ही थार विकत घेतली असून आनंद महिंद्रा यांनी या मुलीचे कौतुक केले आहे.
तापसी उपाध्याय असे या मुलीचे नाव असून ती केवळ २२ वर्षांची आहे. तीने बीटेक पूर्ण केले असून ती 'B.Tech पाणीपुरी वाली' म्हणून प्रसिद्ध आहे. तापसी ही पूर्वी पासून पाणी पूर्वीचा व्यवसाय आहे. आधी ती पाणीपुरीचा गाडा हा टिळक नगरमध्ये होता. मात्र, आता संपूर्ण भारतात तिने ४० हून अधिक पाणी पुरी विक्रीचे स्टॉल्स आहेत.
गेल्या वर्षी तापसीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तापसी रॉयल एनफिल्ड गाडी चालवताना दिसली होती. तिने तिचा पाणीपुरीचा गाडा हा तिच्या बुलेटला जोडलेला होता. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तापसीचा स्कूटी ते बाईक आणि आता तिच्या महिंद्रा थारपर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.
आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, "ऑफ-रोड वाहने बनवण्याचा नेमका उद्देश काय ? पूर्वी लोक त्यांच्या इच्छित स्थळी हवे तेव्हा जाऊ शकत नव्हते. यामुळे कार किंवा इतर वाहने त्यांना त्या ठिकाणी घेणून जाण्यास मदत करतात. त्यांना अशक्य असणारा प्रवास शक्य करतात. आमच्या कार नागरिकांना प्रगती करण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने जगण्यास मदत करतात. हे या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्की पटेल.
आनंद महिंद्रा यांनी शेकर केलेला हा व्हिडिओ ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रमाने हवे ते साध्य केल्या जाऊ शकते असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.