मोठी बातमी! रशियाला जाणारं विमान कोसळलं! १०० हून अधिक प्रवाशांच्या मृत्यूची भीती, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठी बातमी! रशियाला जाणारं विमान कोसळलं! १०० हून अधिक प्रवाशांच्या मृत्यूची भीती, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी! रशियाला जाणारं विमान कोसळलं! १०० हून अधिक प्रवाशांच्या मृत्यूची भीती, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Dec 25, 2024 02:10 PM IST

Azerbaijan Airlines Flight Crash : कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश झाल्यानंतर मोठा स्फोट झाला असून यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Russia bound plane crash
Russia bound plane crash

Azerbaijan Airlines Flight Crash : कझाकस्तानमधील अॅक्टाऊ शहराजवळ भीषण  विमान दुर्घटना झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यावर  वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, हे विमान थेट खाली कोसळले व मोठा स्फोट झाला.  या विमानात १०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ख्रिसमस सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजरबाईजन एरलाईनचं हे विमान असल्याची माहिती आहे. 

या दुर्घटनेत सहा प्रवासी जिवंत असल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कझाकस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टाऊ विमानतळाजवळ हा अपघात झाला. हे विमान अझरबैजान एअरलाइन्सचे होते. हे विमान रशियातील  ग्रोझनी येथे  जात होता. ग्रोझनीमध्ये दाट धुक्यामुळे या विमानाला मार्ग  वळविण्यास सांगण्यात आले होते.

कझाकिस्तान सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, विमानाच्या अपघाताची माहिती मिळताच  बचाव पथके वेगाने घटनास्थळी पोहोचले आहे.  अग्निशामक दलाने आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेत कीती प्रवाशांचा मृत्यू झाला या बाबत अद्याप माहिती दिली जात नसली तरी प्राथमिक अहवालानुसार या दुर्घटनेतून काही जण बचावले आहेत. 

विमानात १०५ प्रवासी 

या विमानात १०५  प्रवासी आणि ५  क्रू मेंबर्स होते. विमान कोसळल्यानंतर सोशल मीडियावर विमान कोसळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. हे दृश्य भयानक आहे तसेच अपघाताची तीव्रता यामुळे कळत आहे.  व्हायरल झालेल्या व्हिडिओत हवेत असलेले विमान जमिनीच्या दिशेने येऊन ते खाली आदळल्याचे दिसत आहे. यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली आहे.  विमानाच्या तुटलेल्या  भागाजवळ आपत्कालीन बचावपथक असून या घटनेत  बचावलेल्यांना ते  बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. 

या दुर्घटनेबाबत अझरबैजान एअरलाइन्सकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र या दुर्घटनेत सहा प्रवासी बचावल्याची माहिती काही वृत्तांमध्ये देण्यात आली आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ब्राजीलमध्ये कोसळले होते विमान 

यापूर्वी ब्राझीलमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. या विमान अपघातात  १० जणांचा मृत्यू झाला होता. ग्रामाडो शहरातील एका मोबाईल फोनच्या दुकानावर हे विमान कोसळले. यात १०  प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२  हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर