अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बंगलुरु पोलिसांनी याप्रकरणी ३ अज्ञात लोकांविरोधात धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपात गुन्हा दाखल केला आहे. ही स्पेशल ट्रेन अयोध्येहून म्हैसूरला भाविकांना घेऊन येत होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आरोपी शुक्रवारी रात्री सुमारे ८.४० वाजता ट्रेनच्या दुसऱ्या बोगीत चढले होते. यावेळी जेव्हा भाविकांनी 'जय श्री राम' च्या घोषणा दिल्या तेव्हा त्यांनी ट्रेनला आग लावण्याची धमकी दिली.
यावर ट्रेनमधील अन्य प्रवाशी संतप्त झाले व त्यांनी या लोकांनी पकडले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना अटक करण्यात न आल्याने प्रवाशांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरूवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच भाजपचे शेकडो कार्यकर्ते व समर्थक रेल्वे स्टेशनवर एकत्र झाले. त्यांनी संबंधित तीन आरोपींच्या अटकेची मागणी केली. वातावरण बिघडताना पाहून बेल्लारीचे पोलीस अधीक्षक बीएल श्रीहरिबाबू अनेक ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोबत घेऊन रेल्वे स्टेशनवर आले. त्यांनी सांगितले की, याप्रकरणात होसपेटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५ A (धार्मिक भावना दुखावणे), ५०४ (जाणून-बुझून अपमान करणे), ५०६ (जीवे मारण्याची धमकी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.
भाजप नेत्यांनी संबंधित घटनेचा निषेध केला आहे. तसेच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. 'व्होट बँकेसाठी काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. अशा धमक्या देणाऱ्यांच्या पाठीत लाथा घालायला हव्यात,' असे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या