मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या जयघोषाने अयोध्या नगरी दूमदुमली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या जयघोषाने अयोध्या नगरी दूमदुमली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2024 08:59 AM IST

Ayodhya Ram Temple : अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यास अवघे काही दिवस राहिले आहे. आज पासून या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यास अयोध्या नगरीत सुरुवात झाली आहे.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Temple : अयोध्येत राम मंदीराचे काम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला आज पासून सुरुवात होणार आहे. अयोध्या नगरीत १६ ते २२ दरम्यान, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अयोध्या नगरीत भविकांचा ओघ सुरू झाला आहे. प्रभू श्री रामाच्या जायघोषाने अवघी आयोध्यानगरी दुमदुमली आहे.

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कहर सुरूच! महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय ? आयएमडीने दिला हा अलर्ट

अयोध्या नगरीत आज पासून भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. आज मंगळवारपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे. ही पूजा अखंड चालणार आहे. १८ जानेवारीला या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाला ओढ लागली असलेल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही दिवस उरले आहेत.

या सोहळ्या निमित्त माहिती देतांना, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, राममंदिर सोहळ्याची तयारी ही जय्यत सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक येणार आहेत. तसेच अनेक मान्यवरांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. १८ तारखेला राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाची मूर्ती स्थानावर ठेवण्यात येणार असून २२ तारखेला ठीक दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त वाराणसीच्या गणेशवर शास्त्री द्रविड यांनी ठरवला आहे.

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद! वाचा

दरम्यान, आज पासून अयोध्येत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपल्यामुळे मंगळवार पासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू करण्यात येणार आहेत. तर बुधवारी १७ जानेवारी रोजी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यानंतर गुरुवारपासून (दि १८) मूर्तीचा अभिषेक विधी सुरू केला जाईल. या सोबतच मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा देखील गुरुवारी केली जाणार आहे. शुक्रवारी (दि १९) राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. तर शनिवारी (दि २०) राम मंदिराचे गर्भगृह ८१ कलशांनी पवित्र करण्यात येणार आहे. या साठी देशभरातील विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. यानंतर वास्तु शांती केली जाणार आहे. रविवारी (दि २१) यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन केले जाणार आहे. तर रामलल्लालाच्या मूर्तीला १२५ कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येणार आहे. सोमवारी २२ तारखेला मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा करण्यात येणार असून १२.२९ ते १२.३० पर्यंत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

यानंतर रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, या सोहळ्याची सर्व तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्या नगरी सोबतच संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे.

WhatsApp channel

विभाग