मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Ram Moorti : राम मंदिरात स्थापित होणारी मूर्ती ठरली; ‘या’ मूर्तिकाराने साकारले प्रभू रामाचे मनमोहक रूप

Ayodhya Ram Moorti : राम मंदिरात स्थापित होणारी मूर्ती ठरली; ‘या’ मूर्तिकाराने साकारले प्रभू रामाचे मनमोहक रूप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 02, 2024 09:45 AM IST

Ayodhya Ram Mandir Ramlala Idol: अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून ही मूर्ती तयार झाली आहे.

Ayodhya Ram Mandir Ramlala Idol
Ayodhya Ram Mandir Ramlala Idol

Ayodhya Ram Mandir Ramlala Idol: अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्टपणा होणार आहे. दरम्यान, मंदिरात स्थापित करण्यात येणारी रामाची मूर्ती तयार झाली असून त्याचे फोटो देखील पुढे आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहे. सध्या या मूर्तीची चर्चा सुरू आहे.

अयोध्येतील मंदिरात जी रामाची मूर्ती बसवली जाणार आहे. ती मूर्ती कर्नाटकातील मूर्तीकार योगीराज अरुण यांनी तयार केली आहे. त्यांनी रामाचे मनमोहक रूप तयार केले आहे. अरुण योगीराज हे प्रसिद्ध मूर्तीकार असून प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुण यांचे आजोबा वाडियार घराण्यातल्या महाल तयार करायचे. अरुण यांनी २००८ मध्ये एमबीए पूर्ण करून त्यांनी त्यांचा वारसा जपण्याचे ठरवत मूर्तिकार होण्याचे ठरवले. काही काळ एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर अरुण यांनी मूर्तीकाम करण्यास सुरुवात केली.

Maharashtra weather update : अरबी समुद्रात कमी दाबचा पट्टा! राज्यातील 'या' भागावर पावसाचे सावट; थंडी वाढणार

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बाबत ट्विटरवर पोस्ट केली आहे. यात ही मनमोहक मूर्ती आणि मूर्तिकार योगिराज अरुण आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये रामाची मृती तयार झाली असून ती प्रतिष्ठापणेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी मूर्तिकार योगिराज अरुण यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांनी योगीराजांच्या नावाचा उल्लेख केला होता.

Wardha murder : वर्ध्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूवरुन वाद; मोठ्या भावाने लहान भावाला काठीने बदडून संपवलं

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी देखील ट्विटरवर आनंद व्यक्त करत पोस्ट लिहिली आहे. 'म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात अभिषेक करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या श्रीरामाचा अभिमान आणि आनंद द्विगुणित झाला आहे. शिल्पकार योगीराज अरुण यांचे हार्दिक अभिनंदन, असे त्यांनी म्हटले आहे.

येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनीही योगीराजांचे राज्य आणि म्हैसूरला अभिमान वाटल्याबद्दल कौतुक केले. विजयेंद्र म्हणाले, 'अद्वितीय शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामललाची मूर्ती २२ जानेवारीला अयोध्येत बसवणं ही म्हैसूरची, कर्नाटकची शान आहे.'

WhatsApp channel

विभाग