मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात महापूजेला सुरुवात, राजाधिराजांच्या रूपाने आज प्रभू श्री रामाचा होणार मंदिरात प्रवेश

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात महापूजेला सुरुवात, राजाधिराजांच्या रूपाने आज प्रभू श्री रामाचा होणार मंदिरात प्रवेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 21, 2024 08:20 AM IST

Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहे. शनिवारी मंदिरात पवित्र जल शिंपडण्यात आले. तर आज रविवारी महापूजेला सुरुवात करण्यात आली आहे.

Ram Mandir Pran Pratishtha
Ram Mandir Pran Pratishtha

Ayodhya Ram Mandir : देशभरात राममंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. देशभरातून विविध मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिरात रामललाच्या अभिषेकासाठी सुरू असलेल्या विधींच्या मालिकेत शनिवारी नव-दिव्य मंदिरात सिंहासनापासून जमिनीपर्यंत देशभरातून आणलेल्या नद्यांचे पवित्र पाणी शिंपडून ८१ चांदीच्या कलशांचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर आज रविवारी मंदिरात महापूजेला सुरुवात करण्यात आली असून रामलल्ला रविवारी संध्याकाळी राजाधिराज म्हणून मंदिरात प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Weather Update : देशात काही ठिकाणी शीतलहर तर कुठे पावसाचा अंदाज! महाराष्ट्रात असे असेल हवामान

राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळा उद्या सोमवारी होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. तर देशात देखील उत्साहाचे वातावरण आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे. राम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी १६ जानेवारीपासून राम मंदिरात विधींना सुरुवात करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार आहेत. रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी करण्यात येत आहेत. १२१ आचार्य हे विधी करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण होईल. तर रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी हे देखील ११ दिवसांचे खास अनुष्ठान करत आहेत.

CM Eknath Shinde : राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाहीत; ट्विट करत सांगितलं कारण

दरम्यान, शनिवारी मंदिरात पवित्र जल शिंपडण्यात आले. या विधीनंतर वैदिक मंत्रोच्चारांमुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिराच्या प्रत्येक भागात देवतांचा वास असून या प्राणप्रतिष्ठेचे आचार्य अरुणकांत दीक्षित म्हणाले की, मंदिराच्या प्रत्येक भागात देवतांचा वास आहे. त्या देवतांच्या दैवी शक्तीचा जागर करण्यासाठी वास्तूसह मूर्तीच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. तर २२ जानेवारीच्या मुख्य उत्सवासाठी मंदिराच्या शिखरासह संपूर्ण परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे.

रामललाच्या भव्य मंदिरात जीवन अभिषेक विधीच्या शेवटच्या टप्प्यात रामलला रविवारी संध्याकाळी राजाधिराज म्हणून मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता २२ जानेवारीनंतर सुरू होणारे मंदिर सध्या सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बसलेल्या राम लल्लाला मूर्तीला नवीन मंदिराच्या गर्भगृहात घेऊन जाणार आहेत. याआधी रामललाची पूजा सामान्य दिवसांप्रमाणे सुरू होती.

WhatsApp channel

विभाग