Ram Temple Pran Pratishtha Ceremony: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अत्यंत कमी वेळ राहिला आहे. या कार्यक्रमाला भव्य स्वरुप देण्यासाठी अयोध्येत तयारीला अंतिम स्वरुप दिले जात आहे. याशिवाय, राजकीय, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांसह अनेकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे नाव जोडले गेले आहे. विराट आणि अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात दोघेही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण पत्रिका स्वीकारताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यात ती खूप साधी आणि सुंदर दिसत आहे. तर. विराट कोहली डेनिम शर्टसोबत पांढरी पँट घातलेला दिसत आहे. दोघांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण पत्रिकेसह फोटो काढला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. ज्यात, गायिका आशा भोसले, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, अरुण गोविल, अजय देवगण यांचा समावेश आहे. आणि दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, चिरंजीवी, यश, मोहनलाल आणि ऋषभ शेट्टी यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा येत्या २२ जानेवारीला होणार आहे. याआधीच्या विधीला १६ जानेवारीपासून म्हणजेच कालपासून सुरुवात झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारीपासून राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत.