मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, पहिला फोटो आला समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, पहिला फोटो आला समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2024 07:36 PM IST

Ram Mandir Gold Door : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू असून आज मंदिराला सुवर्णजडित दरवाजे लावण्यात आले. असे १३ आणखी दरवाजे येत्या ३ दिवसात लावले जाणार आहेत.

Ram Mandir Gold Door
Ram Mandir Gold Door

अयोध्येतील राम मदिरात२२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सरर्व तयारी भव्य दिव्य केली जात आहे. मंदिराचे फोटो तर तुम्ही आधी पाहिले असतील आता मंदिराच्या दरवाजाचा फोटो समोर आला आहे. मंदिरात सोन्याचा दरवाजा लावला आहे. त्याचबरोबर येत्या ३ दिवसात सोन्याचे आणखी १३ दरवाजे लावले जाणार आहेत.

गर्भगृहाच्या मुख्य दरवाजांची पूजा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर गर्भगृहाच्या दोन्ही बाजुला लागणाऱ्या दरवाजांवर काम केले जात आहे. मंदिर परिसरातील कार्यशाळेत या दरवाजांना पाहू शकता. दरवाजांवर हत्ती, कमळ तसेच अन्य कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.

हैदराबादमधील १०० वर्षे जुनी कंपनी अनुराधा टिंबर राम मंदिरासाठी लाकडाचे दरवाजे तयार करत आहेत. मात्र हे दरवाजे अयोध्येतील वर्कशॉपमध्ये तयार केले जात आहेत. दरवाजांवरनागर शैली प्रतिबिंबित करण्यात आली आहे.मंदिराच्या दरवाजांना सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे.

या नक्षीदार दरवाजांवर विष्णु कमल, वैभवाचे गज हत्ती आदि चित्र कोरण्यात आली आहेत. हे दरवाजे सागवानी लाकडापासून बनवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात एकूण ४४ दरवाजे लावले जातील. त्यातील १४ दरवाजांवर सोन्याचा तर ३०दरवाजांवर चांदीचा मुलामा दिला जाईल. त्याचबरोबर राम लल्लाचे सिंहासनही चांदीचे बनवण्यात येणार आहे.

प्राण-प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी ८ हजाराहून अधिक व्हीआयपी लोक देश-विदेशातून येणार आहेत. अयोध्या विमानतळावर कमर्शियल फ्लाइटसोबतच ४० चार्टर्ड प्लेन उतरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्या एयरपोर्टवर सध्या आठ शहरांसाठी एअरपोर्ट कनेक्टिविटी सुरू झाली आहे. या शहरांमध्ये लखनऊ, दिल्ली, मुंबई, कोलकाता अहमदाबाद, चेन्नई आणि गोवा शहरांचा समावेश आहे.

WhatsApp channel