राममंदिर उद्घाटन आणि रामल्ला प्राणप्रतिष्ठापना दिवशी २२ जानेवारी रोजी केवळ आमंत्रित लोकच अयोध्येत येऊ शकतील. यामुळे ज्या भाविकांनी या दिवशी हॉटेल व धर्मशाळांमध्ये प्री- बुकिंगकेली आहे, ती सर्व बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. या दिवशी भारतातील केवळ VVIP लोकच अयोध्यामध्ये येऊ शकणार आहेत. अयोध्या विमानतळावर १०० विमाने येण्याची शक्यता आहे.
या दिवशी आमंत्रित लोकांसोबतच सरकारी ड्यूटीसाठी तैनात कर्मचारी व अधिकारी अयोध्येत येऊ शकतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी हे निर्देश अयोध्या जिल्हा प्रशासनाला दिले.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी २२ जानेवारीला लोकांनी अयोध्येत मोठ्या प्रमाणात रुम बुकिंग झाले होते. मात्र आता सर्व बुकिंग रद्द करण्यात आली आहेत.२२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येत राहू शकतील, ज्यांच्याकडे ड्युटी पास किंवा श्री रामतीर्थ ट्रस्टचे निमंत्रण पत्र असेल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी काही लोकांनी स्थानिक हॉटेल आणि धर्मशाळा बुक केल्याचं समोर आलं आहे. सरकार आणि प्रशासनाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती रद्द करावीत, कारण त्यादिवशी भारतातून विशेष निमंत्रित अयोध्येत येणार आहेत.
जवळपास दीड ते दोन लाख नागरिक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. अयोध्येत येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पार्किंग व्यवस्था, लोकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या