Ayodhya Ram Temple : अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात केली जाणार आहे. तर १६ जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा देखील सुरू होणार आहे. १८ जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. स्थापित होणारी प्रभू श्रीरामाची मूर्ती एकदम खास आहे. ही मूर्ती ५१ इंच उंच, १.५ टन वजनाची आहे. मृतीचे रूप हे निरागस लहान मुलासारखंन आहे. हे रूप अतिशय मोहक, लाघवी, तेजस्वी असे आहे. भगवान रामाची मूर्ती बालस्वरुपात साकारण्यात आली आहे. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे या मूर्तीच्या स्नान घालतील, असे नियोजन मंदिराचा गाभारा बांधतांना करण्यात आले आहे.
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी रामाच्या मूर्ती संदर्भात माहिती दिली. १६ जानेवारीपासून या मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. १८ जानेवारीला गाभाऱ्यात तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मूर्तीवर पाणी, दूध किंवा आचमन यांचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असे चंपत राय यांनी सांगितले.
राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापना करण्यात येणारी रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज आणि गणेश भट्ट यांनी तयार केलेली आहे. ही मूर्ती कृष्णवर्णीय आणि उभी आहे. ही मूर्ती गडद काळ्या कर्नाटक ग्रॅनाइट दगडापासून बनवण्यात आली आहे. मूर्ती कमकुवत होऊ नये म्हणून मूर्तीमध्ये लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही.
चंपत राय म्हणाले, प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि गर्भगृह अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तयार कर्णयात आले आहे. हे गर्भगृह अशापद्धतीने तयार कर्णयात आले आहे की, दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला, रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे ही स्वत: श्रीरामाला अभिषेक करतील. एकाच आकाराच्या तीन मूर्ती तयार कर्णयात आल्या आहेत. त्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे. श्री राम मूर्तीच्या सौम्यतेचे वर्णन करताना ते म्हणाले की, गडद रंगाच्या दगडाने बनवलेल्या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे देवत्व आणि राजपुत्राचे वैभव आहे. त्याच वेळी, यात पाच वर्षांच्या मुलाचा निरागसपणा देखील आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावर विशेष तेज असून कोमलता, डोळ्यातील निरागसता, स्मित हास्य, शरीर आदी बाबी लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आली आहे.
मूर्तीवरील मस्तक, मुकुट आणि आभा आणि कोरीव कामे देखील करण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून अभिषेक सोहळा सुरू होणार आहे. त्याचवेळी १८ जानेवारीला गर्भगृहात राम सिंहासनावर विराजमान होणार आहे. ५ वर्षे जुनी प्रभू रामाची मूर्ती मंदिराच्या तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहे. २२ जानेवारीला तिचे अनावरण होणार आहे. ८ महिन्यांनंतर मंदिर तयार होईल तेव्हा पहिल्या मजल्यावर भगवान श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण, माता सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती ठेवल्या जातील.