पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी शनिवारी रामनगरी अयोध्येत १५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण केले. सरकारकडून केवळ हिंदू तीर्थक्षेत्रांचाच विकास केला जात असलेल्या विरोधकांच्या आरोपाला मोदींनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, एक काळ होता, जेव्हा रामलल्ला झोपडीत विराजमान होते. आज पक्के घर केवळ रामालाच नव्हे तरदेशातील चार कोटी गरीब कुटूंबाना मिळाले आहे. भारत आज आपल्या तीर्थस्थळांचा विकास करत आहे त्याचबरोबर डिजिटल टेक्नालॉजीमध्येही पुढे जात आहे. देशात ३० हजाराहून अधिक पंचायत भवन निर्माण केले जात आहेत.
मोदी म्हणाले की, राममय असलेल्या अयोध्या धाममध्ये आज विविध विकास कामांचे लोकार्पण आणि शिलान्यास करुन मला अभिमान वाटत आहे.
अयोध्या धाम विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी म्हणाले की, या विमानतळाचे नामकरण महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने केल्याने या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आशीर्वाद मिळेल. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे,जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम, आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडण्याचे काम करेल.
मोदी म्हणाले की,देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख खूप ऐतिहासिक आहे. या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित या शुभदिनी स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला आज अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत आहे.
संबंधित बातम्या