Ayodhya Deepotsav : २८ लाख दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी; गिनीज बुकात एकाच वेळी २ विक्रमाची नोंद, पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Deepotsav : २८ लाख दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी; गिनीज बुकात एकाच वेळी २ विक्रमाची नोंद, पाहा VIDEO

Ayodhya Deepotsav : २८ लाख दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी; गिनीज बुकात एकाच वेळी २ विक्रमाची नोंद, पाहा VIDEO

Updated Oct 30, 2024 10:52 PM IST

Ayodhya Deepotsav 2024 : अयोध्येत सीएम योगी यांच्या हस्ते दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. यासोबतच रामाच्या पौडीवर एकाच वेळी दोन नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाले आहेत. येथे २५ लाखांहून अधिक दिवे लावण्याबरोबरच एक हजारांहून अधिक लोकांनी मिळून आरतीचा विक्रमही केला आहे.

अयोध्या दिपोत्सवात दोन रेकॉर्ड
अयोध्या दिपोत्सवात दोन रेकॉर्ड

Ayodhya Deepotsav 2024: भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयूच्या ५५ घाटांवर एकाच वेळी २८ लाख दिव्यांची रोषणाई करुन 'राम की पाडी' उजळून निघाली आहे.  राम की पाडीवर दोन नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाले आहेत. अयोध्येत ३५ लाख दिवे प्रज्वलित झाले असले तरी राम की पौडीला अर्ध्या तासात एकाच वेळी २५ लाख १२ हजार ५८५ दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यासोबतच  ११२१ जणांनी एकत्र सरयूची आरती करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. दोन्ही विक्रम करण्याची घोषणा कंसल्टंट निश्चल बारोट यांनी स्वत: शरयूवर बांधलेल्या व्यासपीठावरून केली. त्यांच्या या घोषणेने संपूर्ण शरयू किनारा टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. यापूर्वी २०२३ मध्ये सुमारे २२ लाख २३ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.

दीपोत्सवात विक्रमी २५ लाख १२ हजार ५८५ दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. हे अनोखे दृष्य पाहण्यासाठी शरयूच्या दोन्ही बाजूला हजारो लोक जमले होते.  शरयूच्या दुतर्फा जमलेल्या हजारो लोकांनी दीपोत्सवाचा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर शरयूच्या सर्व ५५ घाटांवर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लेझर शो, ड्रोन शो, फटाक्यांची आतषबाजी हे मुख्य आकर्षण होते. 

विशेष म्हणजे, तब्बल ५०० वर्षांनंतर पहिल्यांदाच अयोध्येतील लोक रामललाच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करत आहेत. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राम की पाडीसह ५५ घाट २५ लाख दिव्यांनी उजळून निघाले. श्रीरामलल्लाच्या भव्य मंदिरात बसण्याच्या आनंदात यंदाचा दीपोत्सव खास होता. साकेत कॉलेज ते रामकथा पार्क म्हणजेच रामपथ हा संपूर्ण रस्ता सकाळी पाण्याने धुवून स्वच्छ केला होता.

उजळून निघाली अयोध्या
उजळून निघाली अयोध्या

संध्याकाळ होताच विद्युत रोषणाईच्या केशरी दिव्यांची चमक सर्वांना आकर्षित करू लागली. शहरभर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून भक्तिसंगीताचा गजर झाला. राम की पाडी, चौधरी चरणसिंग घाट, भजन संध्या स्थळ यासह अनेक ठिकाणी ३० हजार स्वयंसेवकांनी दिवे बसविण्याचे काम एक दिवस अगोदरच पूर्ण केले होते. अर्ध्या तासात २५ लाख दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला.

दिव्यांनी उजळून निघाली अयोध्या
दिव्यांनी उजळून निघाली अयोध्या

दीपोत्सवापूर्वी भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह पुष्पक विमानाने (हेलिकॉप्टरने) दाखल झाले. योगींनी त्यांचे स्वागत केले. संपूर्ण रामदरबार रथावर स्वार झाला तेव्हा योगींनी आपल्या हातांनी रथ ओढला आणि रामकथा उद्यानात आणला. येथे योगींनी रामाची आरती केली आणि राज टिळक केले.

अयोध्येत दीपोत्सव
अयोध्येत दीपोत्सव

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतरची पहिली दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दीपोत्सवाच्या आठव्या पर्वासाठी रामनगरी अनेक दिवसांपासून सज्ज झाली होती. बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते.  एकीकडे देखाव्यांनी मनाला भुरळ घातली, तर दुसरीकडे रामभक्त रस्त्यावर जल्लोष करताना दिसले.

साकेत कॉलेज ते रामकथा पार्क पर्यंत मिरवणूक काढण्यात आली असून १८ विशेष देखावे हे या दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण होते. 

१८ देखाव्यांपैकी ११ देखावे माहिती विभागाने, तर सात देखावे पर्यटन विभागाने तयार केले होते.  पर्यटन विभागाने सजवलेल्या चित्ररथामध्ये तुलसीदास यांनी रचलेल्या रामचरितमानसच्या बालकांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंदा कांड, सुंदर कांड, लंका कांड आणि उत्तर कांड या सात अध्यायांवर आधारित सुंदर देखावे सादर करण्यात आले.

तसेच श्रीरामाचे शिक्षण, सीता-राम विवाह, वन गमन, भारत मिलाप, शबरी प्रकरण, अशोक वाटिका, हनुमानाचा लंकेचा प्रवास, शक्तीबाणामुळे लक्ष्मणाचे बेशुद्ध होणे, रावण वध, अयोध्या आगमन आणि दीपोत्सवावर आधारित झांक्यांचे विशेष प्रदर्शन सादर करण्यात आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर