Trending News : सुंदर मूल व्हावं म्हणून 'या' देशातील महिला खातात पांढऱ्या कुत्र्याची कवटी!-avoid lamb eat dogs skull for beautiful child bizarre chinese beliefs ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending News : सुंदर मूल व्हावं म्हणून 'या' देशातील महिला खातात पांढऱ्या कुत्र्याची कवटी!

Trending News : सुंदर मूल व्हावं म्हणून 'या' देशातील महिला खातात पांढऱ्या कुत्र्याची कवटी!

Sep 04, 2024 05:37 PM IST

Viral News: कोणत्या देशात गर्भवती महिलांना कुत्र्याची कवटी खायला दिली जाते? हे जाणून घेऊयात.

 'या' देशातील गर्भवती महिला खातात पांढऱ्या कुत्र्याची कवटी!
'या' देशातील गर्भवती महिला खातात पांढऱ्या कुत्र्याची कवटी!

Viral Story: गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण आपपल्या पद्धतीने सल्ले देतात. यासोबतच डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचेही पालन केले जाते. दरम्यान, आपले मुल सुंदर, हुशार आणि तंदुरुस्त जन्माला यावे, यासाठी अनेकजण विविध पद्धतींचा अवलंब करतात. भारतात सुंदर बाळ जन्माला यावे म्हणून गर्भवती महिलांना बदाम आणि संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो. पण चीनमध्ये सुंदर मुलं जन्माला घालण्यासाठी गर्भवती महिलांना कोणता सल्ला दिला जातो? ते जाणून घेऊयात.

चीनमध्ये गर्भवती महिलांसाठी अनेक विचित्र परंपरा आहेत, ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. चीनमध्ये सुंदर बाळ जन्माला यावे म्हणून गर्भवती महिलांना पांढऱ्या कुत्र्याची कवटी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच बाळाच्या बुद्धीचा चांगला विकास होतो, असेही म्हटले जाते. पंरतु, हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे.

छोट्या भांड्यात भात खाण्याचा सल्ला

चीनमधील लोकांचा असाही समज आहे की, गर्भवती महिलांनी संध्याकाळी जेवताना छोट्या भांड्यात भात खायला पाहिजे, यामुळे बाळाचे डोके लहान आणि सुंदर होते. आजही येथील लोक यावर विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टींचे पालन करतात.

प्रसूती करण्यासाठी आलेल्या महिलेला प्रथम स्वयंपाक घरात पाठवतात

असेही बोलले जाते की, गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी मदत करण्यासाठी येणाऱ्या महिलेला सर्वात प्रथम घराच्या स्वयपांकघरात जाऊन तेथील चाकूला हात लावायला सांगितले जाते. असे केल्याने सर्व वाईट आणि नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि प्रसूतीच्या वेळी महिलांना जास्त त्रास होत नाही.

आपला समाज कितीही प्रगत झाला तरी अंधश्रद्धा अशी एक गोष्ट आहे, जी समाजाला प्रगती करण्यापासून सतत अडवत असते. आपण कितीही साक्षर असलो तरीही काही बाबतीत आपण अंधश्रद्धेला बळी पडतोच. म्हणूनच एकविसाव्या शतकातही अनेक भोंदू बाबा, साधू हे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करीत आहेत.

राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अशा आशयाचे पत्रक राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने गेल्या महिन्यात जारी केले. महाराष्ट्रातून जादूटोणा, बुवाबाजीला हद्दपार करण्यासाठी ते उपयुक्त पाऊल ठरेल, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी दिली.