केदारनाथमधील लोकांच्या काळजात पुन्हा झालं धस्स..; हिमस्खलनानंतर वेगाने खाली आला बर्फाचा ढिगारा, पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  केदारनाथमधील लोकांच्या काळजात पुन्हा झालं धस्स..; हिमस्खलनानंतर वेगाने खाली आला बर्फाचा ढिगारा, पाहा VIDEO

केदारनाथमधील लोकांच्या काळजात पुन्हा झालं धस्स..; हिमस्खलनानंतर वेगाने खाली आला बर्फाचा ढिगारा, पाहा VIDEO

Published Jun 30, 2024 07:11 PM IST

KedarnathNews : बर्फाचा ढिगारा कोसळताना पाहून दर्शनासाठी आलेले भाविक एकत्र जमा झाले. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.काही वेळासाठी बर्फाचं वादळ आल्यासारखी स्थिती झाली होती.

हिमस्खलनानंतर वेगाने खाली आला बर्फाचा ढिगारा, पाहा VIDEO
हिमस्खलनानंतर वेगाने खाली आला बर्फाचा ढिगारा, पाहा VIDEO

kedarnath snow mountain collapsed: उत्तराखंड राज्यातील वातावरण बदललं आहे. या दरम्यान केदारनाथमधून एक भयंकर वृत्त समोर आले आहे. केदारनाथमध्ये (Kedarnath) पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे. रविवारी सकाळी हिमस्खलन झाल्यानंतर पर्वतावरील बर्फ वेगाने खाली घसरला. येथील गांधी सरोवराच्या वरती हिमस्खलन झाले व बर्फाचा पर्वत खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

केदारनाथ मंदिराच्या जवळ लावलेल्या एका कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. बर्फाने झाकलेला पर्वताचा भाग वेगाने खाली येताना यात दिसत आहे. बर्फाचा ढिगारा कोसळताना पाहून दर्शनासाठी आलेले भाविक एकत्र जमा झाले. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.काही वेळासाठी बर्फाचं वादळ आल्यासारखी स्थिती झाली होती. यामुळे भाविकांमध्ये घबराट पसरली होती.

घटना उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील आहे. केदरानाथ मंदिराच्या जवळ गांधी सरोवराच्या वरती ही दुर्घटना झाली. या घटनेची माहिती देताना रुद्रप्रयागचे एसएसपी डॉ. विशाखा अशोक भदाणे यांनी सांगितले की, ही घटना रविवारी सकाळी ५ वाजता घडली आहे. येथे हिमस्खलनची घटना घडली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला केदारनाथ येणाऱ्या भाविकांची गर्दी दिसून आली होती. पहिल्या आठवड्यात जवळपास ६ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. १० मे पासून आतापर्यंत ७ लाखाहून अधिक भाविकांनी ११ व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये केदारनाथमध्ये तीन वेळा हिमस्खलन झाले होते. तर २०२३ मध्ये मे व जून महिन्यात चौराबाडी येथे पाच वेळा हिमस्खलनाची घटना घडली आहे. केदारनाथमध्ये १६ जून २०२३ ला ढगफुटी झाल्याने पूर आला होता. या पुरात प्रचंड नुकसान झालं होतं. त्यावेळी केदारनाथमधील जनजीवन पूर्ववत होण्यासाठी बराच काळ लागला होता. त्यामुळे आज झालेल्या हिमस्खलनाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

भारतीय भौगोलिक विज्ञान संस्था आणि वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेच्या विज्ञानिकांनी या क्षेत्राचे भौगोलिक व हवाई सर्वेक्षण करुन संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला होता. वैज्ञानिक दलाने तेव्हा हिमालयीन क्षेत्रात घडणाऱ्या या घटना सामान्य असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी केदारनाथ मंदिर क्षेत्रात सुरक्षा व्यवस्था आणखी सुधारण्यावर भर दिला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर