Australian female mp sexually harassed : ऑस्ट्रेलियात एका महिला खासदाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून गंभीर आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील खासदार असलेल्या या महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळ झाल्याचा दावा केला. रात्री पार्टी दरम्यान, त्यांना जबरदस्तीने अंमली पदार्थांचे देण्यात आले. यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ब्रिटनी लॉगा असे या महिला खासदाराचे नाव आहे. त्या ऑस्ट्रेलियात सहाय्यक आरोग्य मंत्री आहेत. त्यांचा मतदारसंघ येप्पूनमध्ये असताना त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला होता.
३७ वर्षीय ब्रिटनी लॉगा यांनी लैंगिक छळ प्रकरणी २८ एप्रिल रोजी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. टेलिग्राफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील पोलीस अधिक तपास करत आहे. रुग्णालयात केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या शरीरात अंमली पदार्थ असल्याचे आढळले आहे. ब्रिटनी लॉगा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत खुलासा केला आहे. ड्रग्जचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला. ड्रग्ज देण्यात आलेल्या इतर महिलांशी संपर्क साधला गेला.
न्यूज एजन्सी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) ने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातील चाचण्यांदरम्यान, ब्रिटनी लॉगा यांच्या शरीरात अमली पदार्थ आढळले असल्याचे सांगितले आहे. या बाबत ब्रिटनी लॉगा म्हणाल्या हा प्रकार कुणासोबतही घडू शकतो. हे आपल्यापैकी अनेकांसोबत घडतं देखील. हे ठीक नाही. ड्रग्ज न घेता आपल्याला शहरात सामाजिक संवादाचा आनंद लुटता आला पाहिजे."
ब्रिटनी लॉगा म्हणाल्या, "मला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या सर्वांचे मी आभारी आहे. तुमच्या काळजीची मला कदर आहे. तुमच्याकडे तपासात मदत करणारी कोणतीही माहिती असल्यास, कृपया पोलिसांना कळवा."
इंग्लंड येथील वृत्तपत्र द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, लॉगासोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
क्वीन्सलँडचे प्रीमियर स्टीव्हन माइल्स म्हणाले की सरकार ब्रिटनी लॉगाला शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करत आहे. ते म्हणाले, "ब्रिटनी ज्या परिस्थितीतून जात आहे त्यातून कोणालाही जावे लागू नये. माझे फक्त लक्ष ब्रिटनी आणि तिच्या आरोग्यावर आहे. मी ब्रिटनीला सांगितले की आम्ही तिला पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत."
संबंधित बातम्या