Atul Subhash : आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानियाला अटक; भावालाही ठोकल्या बेड्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Atul Subhash : आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानियाला अटक; भावालाही ठोकल्या बेड्या

Atul Subhash : आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानियाला अटक; भावालाही ठोकल्या बेड्या

Dec 15, 2024 11:51 AM IST

Atul Subhash Suicide case : पत्नीच्या छळाला कंटाळून बेंगळुरूमध्ये एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया हिला बेंगळुरू पोलिसांनी रविवारी हरियाणातील गुरुग्राम येथून अटक केली आहे.

आयटी अभियंता अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानियाला गुरुग्राममधून अटक; साळ्यालाही ठोकल्या बेड्या
आयटी अभियंता अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानियाला गुरुग्राममधून अटक; साळ्यालाही ठोकल्या बेड्या (ANI Photo)

Atul Subhash Suicide case : पत्नीच्या छळाला कंटाळून बेंगळुरूमध्ये आत्महत्या करणारे एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया हिला बेंगळुरू पोलिसांनी रविवारी हरियाणातील गुरुग्राम येथून अटक केली. निकिताची आई आणि भावाला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड डिव्हिजनचे डीसीपी शिवकुमार यांनी तिन्ही आरोपींच्या अटक करण्यात आलेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अतुलची पत्नी निकिता सिंघानिया हिला हरियाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे, तर तिची आई निशा व भाऊ अनुराग यांना प्रयागराज येथून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने खोटे गुन्हे दाखल केले होते.  या सोबतच त्यांना कौटुंबिक न्यायालयाने सुभाषच्या पगारापैकी जवळपास अर्धा हिस्सा पत्नीला व मुलाला देण्याचे आदेश दिले होते. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानियासह सासरच्या अनेकांवर व्हिडिओ आणि सुसाईड नोट्सच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सुभाष यांनी एलॉन मस्क व डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग  केला होता. या घटनेमुळे पुरुषांवरील कौटुंबिक अत्याचाराचे प्रकरण पुन्हा चर्चेला आहे आहे.  अतुलवरील खटला मागे घेण्यासाठी त्याच्या पत्नीने व सासरच्या मंडळींनी तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच पैसे देता येत नसेल तर जीव देऊन टाक असे देखील त्याला बोलण्यात आले होते.  पत्नी आणि कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून अतुल सुभाष (३४) या अभियंत्याने ९ डिसेंबर रोजी बेंगळुरूयेथे आत्महत्या केली होती. याप्रकरणी निकिता, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त 

एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. अनेकजण कलम ४९८ च्या न्यायसंहितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या कलमाचा अनेक महिलांकडून गैरवापर केला जातो. अतुल यांच्या आत्महत्येचे कारण न्यायालयाचा आदेश नसल्याचे वकील दिनेश मिश्रा यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना वकील दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, पती-पत्नी दोघेही आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. पत्नीला चांगला पगार आहे आणि ती दिल्लीत काम करते, तर अतुल बंगळुरूमध्ये राहत होता आणि दरमहा ८४,००० रुपये कमावत होता. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर