तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात

तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात

Dec 16, 2024 01:22 PM IST

Atul Subhash Suicide Case Story : एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींपैकी तिघांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया हिला गुरुग्राममधून अटक करण्यात आली आहे.

तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात
तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात

Atul Subhash Suicide Case Story : एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींपैकी तिघांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया हीला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली. तर तिची आई निशा व भाऊ अनुराग याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी चुलत भाऊ सुशील सिंघानिया ह्या अद्याप फरार आहे. आरोपींबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

निकिता हिला बेंगळुरू पोलिसांनी शनिवारी गुरुग्रामयेथून अटक केली. निकिता सेक्टर-५७ मध्ये भाड्याच्या पीजीमध्ये राहत होती. मोबाइल लोकेशनच्या आधारे निकिताला पकडण्यात आले आहे. एका आयटी कंपनीत वरिष्ठ एआय इंजिनीअरिंग कन्सल्टंट म्हणून काम करणारी निकिता बऱ्याच दिवसांपासून सेक्टर-५७ मध्ये राहत होती.

पीजी बदलण्याच्या आधीच निकिता अडकली पोलिसांच्या जाळ्यात

निकिता सिंघानियाला बेंगळुरू पोलिसांनी गुरुग्राममधील तिचे राहते ठिकाण बदलण्यापूर्वीच अटक केली आहे. खरं तर निकिताला ८ डिसेंबरलाच पीजी बदलायचं होतं. त्यासाठी तिने काही भाड्याचे पैसे पीजी मालकाकडे व त्याची कागदपत्रे पोलिस पडताळणीसाठी सादर केली होती. तिला ९ किंवा १० डिसेंबरला नव्या पीजीमध्ये शिफ्ट होण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, अतुल सुभाष यांनी ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याने निकिता ही दुसऱ्या पीजीमध्ये शिफ्ट होऊ शकली नाही.

निकिताला ४० हजार भाडे असलेल्या पीजीमध्ये राहायचे होते

८ डिसेंबर रोजी निकिता ही हाँगकाँग मार्केटजवळील लक्झरी पीजीमध्ये आली होती. पीजी केअरटेकर सूरज यांनी सांगितले की, निकिताला राहण्यासाठी एका खोलीची गरज होती. निकिता ज्या पीजीमध्ये राहू इच्छित होती, त्याचे भाडे सुमारे ४० हजार रुपये होते. एक महिन्याच्या भाड्यासह एका महिन्याची अॅडव्हान्स रक्कम देखील भरण्यास ती तयार होती. निकिताने काही रक्कम ऑनलाइन जमा केली होती. पोलिस पडताळणीसाठी तिने तिची कागदपत्रे देखील सादर केली होती. ९ डिसेंबर रोजी सूरजने निकिताची कागदपत्रे पडताळणीसाठी पोलिसांकडे पाठवली होती.

पोलिस व्हेरीपिकेशन

निकिता सिंघानिया हिचा पोलिस व्हेरिफिकेशनचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी बेंगळुरू पोलिसांना ती नव्या पीजीमध्ये शिफ्ट होत असल्याची माहिती दिली. पीजीसाठी ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी तिच्या नव्या पीजीभोवती सापळा रचला. निकिता ही हाँगकाँग मार्केटजवळ येताच पोलिसांनी तिला अटक केली. पीजीकेअरटेकर सूरज यांनी सांगितले की, निकिताला तिच्या नव्या पीजीतून अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी तिला बाहेरच अटक केली.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर