मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Attempted Of Drone Attack On Russian President Putin Russian Government Accuses

Russia Ukraine War: रशियात घुसून युक्रेनचा ड्रोन अटॅक; राष्ट्रपती पुतीन थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

Russia Ukraine War
Russia Ukraine War
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
May 03, 2023 10:16 PM IST

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाला तब्बल १ वर्ष झाले आहे. आता युक्रेनने थेट रशियात घुसून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Russia Ukraine War news update : रशिया आणि युक्रेन युद्धात आज मोठी घटना घडली आहे. गेल्या वर्षभरायपासून सुरू असलेल्या या युद्धात रशियाने युक्रेनला बेचिराख केले आहे. मात्र, युक्रेनने अद्याप हार मानली नसून त्यांनी थेट रशियन अध्यक्ष पुतीन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. युक्रेनने थेट रशियात घुसून पुतीन यांच्या राष्ट्रपती कार्यालयावर ड्रोनने हल्ला केला. या घटनेत पुतीन थोडक्यात बचावल्याची माहिती आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सुद्धा शेअर करण्यात आला आहे. पुतिन यांना जीव मारण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप रशियन सरकारने केला. यामुळे रशिया युक्रेनवर आपला हल्ला आणखी तीव्र करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : पुण्यात क्रोर्याची परिसीमा! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गुप्तांगाला दिले हिटरचे चटके

पुतीन यांचे कार्यालय असलेल्या राष्ट्रपती भवनावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. एक ड्रोन राष्ट्रपती कार्यालयाच्या घुमटावर येत भवनावर मिसाईल डागली. ही घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिसाईल कोसळताच मोठा स्फोट झाला. रशियाच्या एका स्थानिक वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्याने महाआघाडीची ‘वज्रमूठ’ ढिली, पुढच्या सर्व सभा रद्द?

हा हल्ला मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास झाला. क्रेमलिन येथील राष्ट्रपती भवनावर एक ड्रोन येऊन आदळले. यानंतर मोठा स्फोट झाला. यानंतर धुराचे मोठे लोट उठले होते. मात्र, हा हल्ला युक्रेननेच केला आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या हल्ल्यातून पुतीन मात्र, थोडक्यात बचावले आहेत.

 

पुतिन यांच्याच कार्यालयावर हल्ला झाल्यामुळे रशियन सरकार अलर्ट झाले आहे. पुतिन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आधीच युक्रेन आणि रशियामध्ये वर्षभरापासून युद्ध पेटलेलं आहे. त्यातच मॉस्कोत घुसून पुतिन यांच्यावरच हल्ल्याच्या आरोपामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग