मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NIA : पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

NIA : पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 08, 2024 10:37 AM IST

NIA Officials Booked For Molestation : पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला झाल्याच्या दोन दिवसानंतर बंगाल पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

NIA Officials Booked For Molestation : पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर जमावाने हल्ला केल्याच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोवर या प्रकरणात मोठा ट्विटस आला आहे. शनिवारी (दि ६) जमावाने भूपतीनगर येथे एनआयएचे अधिकारी तपास करण्यासाठी गेले असतांना त्यांच्यावर जमावाणे हल्ला केला होता. या प्रकरणी एनआयएच्या पथकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Boy missing : मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरुण बेपत्ता; आई-वडिलांचं परराष्ट्र मंत्रालयाला साकडं

भूपतीनगर येथे एनआयएचे पथक तपास करण्यासाठी शनिवारी गेले होत. यावेळी अचानक आलेल्या जमावाने एनआयच्या पथकावर दगडफेक केली. यात अधिकाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान झाले तर दोन अधिकारी जखमी झाले होते. हे पथक भूपतीनगर येथे डिंसेबर २०२२ दरम्यान, झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेले होते. या घटनेत तिघांचा मुत्यू झाला होता. सध्या या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. त्यांना तशा नोटिसा देखील एनआयएने दिल्या होत्या. दरम्यान, नोटिस देऊनही ते चौकशीसाठी  न गेल्याने एनआयएच्या पथक त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

Nashik Firing : नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भर वस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, हा हल्ला झाल्यावर एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांवर भूपतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४ (विनयभंग) आणि ४४१ (अतिक्रमण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तृणमूलच्या एका कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांने तक्रार दिली आहे. एनआयए अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून महिलांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी सीपीआय (एम)चे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, “राज्य सरकार अशा प्रकारच्या घटनांना चिथावणी देत आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांवर हा हल्ला झाला. या प्रकरणी ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक करण्या ऐवजी तपास पथकावर गुन्हा दाखल करण्यात आला हे दुर्दैवी आहे”, असे ते म्हणाले.

Karnataka News : साडेपाच कोटी रुपये रोख आणि १०६ किलो दागिने; निवडणुकीदरम्यान बेहिशेबी संपत्ती जप्त

केंद्रीय एजन्सीवर हल्ला करणे म्हणजे भारतीय संविधानावर हल्ला करणे होय. एनआयएच्या अधिकाऱ्यांवर त्यांची कर्तव्ये पार पाडल्याबद्दल विनयभंगाचा आरोप करणे हे सर्व घटनात्मक संस्थांची मोडतोड दर्शवते. हे थेट भारतीय राज्यघटनेविरुद्ध केलेले कृत्य आहे, अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार समिक भट्टाचार्य यांनी केली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बालूरघाट येथे निवडणूक रॅलीदरम्यान केलेल्या व्यक्तव्यावर चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. हा हल्ला महिलांनी नव्हे तर एनआयएनेच घडवून आणला, असे बॅनर्जी यांनी आरोप केला होता. एनआयएचे अधिकारी रात्री उशिरा घरात घुसले, आणखी काय अपेक्षित आहे? महिलांनी त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. २०२२ मध्ये भूपतीनगरमध्ये स्फोट झाला आणि आता एनआयएचे पथक पाठवण्यात आले आहे. भीती निर्माण करण्यासाठी. आमच्या सर्व बूथ अध्यक्षांना ताब्यात घेणे हा भाजपचा उद्देश आहे, असे आरोपही बॅनर्जी यांनी केला.

IPL_Entry_Point

विभाग