दिल्लीत रामायणाची पुनरावृत्ती! नव्या मुख्यमंत्री आतिशी भरताप्रमाणे राज्य करणार; केजरीवालांच्या खुर्चीवर बसणार नाहीत!-atishi takes charge as delhi cm said i will run the delhi government like bharat kept the sandals of lord ram ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीत रामायणाची पुनरावृत्ती! नव्या मुख्यमंत्री आतिशी भरताप्रमाणे राज्य करणार; केजरीवालांच्या खुर्चीवर बसणार नाहीत!

दिल्लीत रामायणाची पुनरावृत्ती! नव्या मुख्यमंत्री आतिशी भरताप्रमाणे राज्य करणार; केजरीवालांच्या खुर्चीवर बसणार नाहीत!

Sep 23, 2024 06:38 PM IST

Delhi CM Atishi Marlena : दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत कामकाजाला सुरुवात केली आहे.

आतिशी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या; मात्र, केजरीवालांची जागा ठेवली रिकामी
आतिशी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या; मात्र, केजरीवालांची जागा ठेवली रिकामी (@amitmalviya/ X )

Delhi CM Atishi Marlena : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पदभार स्वीकारला आहे. मात्र, यावेळी आतिशी या केजरीवाल यांच्यासाठी रामायणातील भरताच्या भूमिकेत दिसल्या. मुख्यमंत्री कार्यालयात अरविंद केजरीवाल यांच्या खुर्चीशेजारी दुसरी खुर्ची ठेवून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. दिल्लीतील लोक जोपर्यंत त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवत नाहीत तोपर्यंत ती अरविंद केजरीवाल यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे त्यांनी पदभार देतांना स्पष्ट केलं.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला आहे. पुढील चार महिन्यासाठी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. असे असले तरी आतिशी या रामायणातील भरताच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्या प्रमाणे भरताने प्रभू रामाचे जोडे राज सिंहासनावर ठेवत १४ वर्षे राज्य कारभार सांभाळला, त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचा कारभार सांभाळणार असल्याचं आतिशी यांनी पदभार स्वीकारतांना म्हटलं.

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आतिशी म्हणाले, मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रभू रामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि भरताला राज्य ताब्यात घ्यावं लागलं. तेव्हा भरत यांना ज्या वेदना झाल्या त्या वेदना मी आज भोगत आहे. ज्याप्रमाणे भरताने सिंहासनावर प्रभू रामाचे जोडे ठेवले आणि १४ वर्षे राज्य कारभार केला त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचे सरकार चालवणार आहे.

भाजपवर साधला निशाणा

आतिशी पुढे म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांनी शिष्टाचार आणि नैतिकतेचा आदर्श ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपने अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आणि सहा महिने तुरुंगातही टाकण्यात आले.

आतिशी म्हणाल्या, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे. मला आशा आहे की दिल्लीचे लोक त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून देतील. तोपर्यंत या कार्यालयात खुर्ची राहणार असून आम्ही अरविंद केजरीवालांच्या परतण्याची वाट पाहणार आहोत.

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिल्लीचे पाच मंत्री कैलाश गेहलोत, गोपाल राय, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनी शपथ घेतली. सर्व मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले आहे, परंतु त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी संध्याकाळीच पदभार स्वीकारला होता, तर मुख्यमंत्र्यांसह उर्वरित मंत्री सोमवारीच पदभार स्वीकारतील.

 

Whats_app_banner
विभाग