Iraq hostel Fire : इराकमधील उत्तर भागात असलेल्या एरबिलमधील विद्यापीठात हॉस्टेलच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल १४ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर १८ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली.
इराकमधील उत्तर भागात असलेले शहर एरबिलमधील सोरन शहरात असलेल्या विद्यापीठात हे अग्नितांडव घडलं. या घटने संदर्भात स्थानिक आरोग्य संचालनालयाच्या प्रमुखांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एरबिलच्या सोरन शहरात शुक्रवारी रात्री हे अग्नीतांडव झाले असून रात्री उशिरा आग आटोक्यात आली. तोपर्यंत १४ विद्यार्थी आगीत ठार झाले होते.
आग लागली तेव्हा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थीही होते. आरोग्य विभागाचे प्रमुख कमारम मुल्ला मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार सोरन शहरातल्या विद्यापीठातील इमारतीला आग लागली. या घटनेनंतर इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.
“पीडित कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे टयांनी ट्विट केले आहे. आगीचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले असून यात घटनेची भीषणता दिसून येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेत जखमी झालेल्या मुलांना सोरन शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.