मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  G7 Summit: पंतप्रधान मोदींनी जी-७ परिषदेला केलं संबोधित, AI वर महत्वपूर्ण भाष्य, वाचा भाषणातील ठळक मुद्दे

G7 Summit: पंतप्रधान मोदींनी जी-७ परिषदेला केलं संबोधित, AI वर महत्वपूर्ण भाष्य, वाचा भाषणातील ठळक मुद्दे

Jun 15, 2024 12:35 AM IST

G7 Summit : जी-७ शिखर परिषदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांना एआय तंत्रज्ञानाला विध्वंसक नव्हे तर सर्जनशील बनवण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी जी ७ परिषदेला संबोधित केले.
पंतप्रधान मोदींनी जी ७ परिषदेला संबोधित केले. (X/Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इटलीतील अपुलिया येथे जी-७ शिखर परिषदेला संबोधित करताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नेट झिरो आणि ग्लोबल साऊथ अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान सर्जनशील कामात वापरण्याचे आवाहन मोदींनी केलं.

ट्रेंडिंग न्यूज

मोदी यांनी आपल्या भाषणानंतर 'एक्स'वर पोस्ट केली असून त्यात म्हटले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका आणि भूमध्य सागर, जी-७ , मानवी प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला.

मोदी म्हणाले नवी जीवनाच्या विविध पैलूंमध्ये तंत्रज्ञानाच्या उदयाने सायबर सुरक्षेचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. भारत आपल्या विकास प्रवासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करत आहे याबद्दल बोललो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पारदर्शक, सुरक्षित, सुलभ आणि जबाबदार असणे महत्वाचे आहे. 

‘नमस्ते’ झाले ग्लोबल: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी जी-७ पाहुण्यांचे केलं देशी स्टाईल स्वागत, Video व्हायरल

जी-७ शिखर परिषदेत मोदींनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :- 

1. इटलीतील जी-७ शिखर परिषदेत  मोदी म्हणाले, 'जागतिक दक्षिणेतील देशांचे प्राधान्यक्रम आणि चिंता जागतिक व्यासपीठावर ठेवणे ही भारताने आपली जबाबदारी मानली आहे. 

2. तंत्रज्ञान विध्वंसक नव्हे तर सर्जनशील बनवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना केले. आगामी काळ 'हरित युग' करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले. 

3. लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आल्यानंतर जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे, असे मोदी म्हणाले. 

4. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात भारताच्या पुढाकाराचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये राष्ट्रीय धोरण तयार करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.  

5. गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० परिषदेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, 'गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या जी-२० शिखर परिषदेत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला होता. 

6. २०४७ पर्यंतच्या आपल्या व्हिजनचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान म्हणाले, "२०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा आमचा संकल्प आहे; समाजातील कोणताही घटक मागे राहू नये, अशी आमची बांधिलकी आहे. 

7. 2070 पर्यंत नेट झिरोचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ऊर्जा क्षेत्रातील भारताचा दृष्टिकोन उपलब्धता, सुलभता, परवडणारी क्षमता आणि स्वीकारार्हता या चार तत्त्वांवर आधारित आहे, असे मोदी म्हणाले. 

8. पंतप्रधान मोदी यांनी आफ्रिकन युनियनला जी 20 चे स्थायी सदस्य बनविण्यात भारताच्या भूमिकेची आठवण करून दिली. आफ्रिकेतील सर्व देशांचा आर्थिक आणि सामाजिक विकास, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी भारत योगदान देत आहे आणि यापुढेही देत राहील, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-7 मध्ये द्विपक्षीय बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या परदेश दौऱ्यावर आहेत. जी-७ परिषदेत भाषण करण्यापूर्वी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. 

त्यानंतर त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी अतिशय फलदायी बैठक झाली. युक्रेनबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक आहे. सध्या सुरू असलेल्या शत्रुत्वाबाबत भारत मानवकेंद्रित दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो आणि शांततेचा मार्ग संवाद आणि मुत्सद्देगिरीतूनच आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

WhatsApp channel
विभाग