मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Covishield च्या साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय! बाजारातून लस मागवली परत

Covishield च्या साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय! बाजारातून लस मागवली परत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 08, 2024 09:38 AM IST

Astrazeneca Corona Vaccine: कोरोनावर कंपनीने तयार केलेल्या लसीचे गंभीर दुष्परिणाम समोर आल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली. यामुळे कंपनीने ही लस बाजारातून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीची निर्मिती किंवा विक्री देखील कंपनी करणार नाही.

Covishield साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय, बाजारातून लस परत मागवली
Covishield साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय, बाजारातून लस परत मागवली

AstraZeneca Corona Vaccine: कोरोना महामारी रोखण्यासाठी AstraZeneca ने तयार केलेल्या कोविशील्डमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिमाण होत असल्याची कबुली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटेन मधील न्यायालयात दिली होती. कंपनीच्या या कबुली जबाबामुळे खळबळ उडाली होती. यावर मोठा वाद झाल्यामुळे तसेच ही लस सुरक्षित असल्याचे सांगूनही कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ही लस बाजारातून परत मागवण्याच्या निर्णय AstraZeneca या फार्मा कंपनीने घेतला आहे. यामध्ये भारतात बनवलेल्या कोविशील्ड लसीचाही यात समावेश आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की या लसीचे सर्व डोस हे पुन्हा परत मागवण्यात येत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीत IPL मॅच दरम्यान स्टेडियममध्ये केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा; व्हिडिओ व्हायरल

AstraZeneca द्वारे निर्मित कोरोना लस भारतात Covishield या नावाने तयार करण्यात आली होती. पुण्यातील सीरम येथे या लसीची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या लसीच्या दुष्परिणांमुळे ही लस कंपनीने पुन्हा परत मागवली आहे. यापूर्वी, कंपनीने कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये कबूल केले होते की कोविशील्ड लसीमुळे रक्त गोठण्यासारखे गंभीर दुष्परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. या मुळे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून काढून टाकली जात आहे. टेलिग्राफने मंगळवारी कंपनीच्या हवाल्याने सांगितले की, या लसीची निर्मिती थांबवण्यात आली आहे. तसेच तिचा पुरवठा देखील रोखण्यात आला आहे.

somaiya school: पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट करणे भोंवले! सोमय्या शाळेने मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले

आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल

कोरोना लसीकरणाचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम समोर आल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे कंपनीने केलेल्या खुलाशात म्हटले आहे. कंपनीने याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. माहितीनुसार, बाजारातून लस मागे घेण्याची प्रक्रिया ही ५ मार्च रोजी करण्यात आली होती, जो ७ मे रोजी या बाबत निर्णय घेण्यात आला.

AstraZeneca द्वारे निर्मित कोरोना लस TTS - थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसाठी कारणीभूत असल्याचे आढळून आले. AstraZeneca ने बनवलेली Vaxzevria ही लस यूकेसह अनेक देशांना पुरवण्यात आली होती. या लसीमुळे होणारे दुष्परिणामांचा अभ्यास देखील ही कंपनी करत आहे. आजारी व्यक्तीमध्ये रक्त गोठणे, प्लेटलेट कमी होण्याची तक्रार करनेत आली होती. फेब्रुवारीमध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान कंपनीने लसीकरणानंतर टीटीएस दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले होते.

Pune warje firing : पुण्यातील वारजे माळवाडीत बारामतीतील मतदान संपताच गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी केले फायरिंग

टीटीएसमुळे यूकेमध्ये किमान ८१ नगरिकांचा मृत्यू झाला आहे. कंपनीवर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या ५० हून अधिक नातेवाईकांनी दाखल केलेल्या खटल्याचा सामना करत आहे. भारतातील काही कुटुंबांनी देखील कंपनीविरुद्ध खटले दाखल केले आहेत.

कंपनीने काय सांगितले

AstraZeneca ला टेलीग्राफला दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कोरोना लसीमुळे जागतिक महामारी नियंत्रणात आल्याने आम्हाला अभिमान वाटतो. एका अंदाजानुसार, या लसीमुळे पहिल्या वर्षात ६.५ दशलक्षाहून अधिक नागरीकांचा जीव वाचला. जागतिक स्तरावर तीन अब्जांपेक्षा जास्त लस उत्पादनाला मान्यता मिळाली आहे. जागतिक साथीच्या रोग नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीने मोहटे योगदान दिले आहे.

IPL_Entry_Point

विभाग